त्र्यंबकेवर तालुक्यातील डांग्या सुळका सर करत असतानामधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ८० फूट दरीत कोसळूनमुंबईतील मुलुंडमधील गिर्यारोहक संदीप पाताडे ( २१ )याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली . या ग्रुपमधीलचार जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखलकरण्यात आले .
मुलूंड येथील रहिवासी असलेला संदीप आणि डोंबिवलीयेथील संजय लोकरे , राहुल मेश्राम , सुर्दशन माळगावकरतसेच सुमेश ढमाले हे पाच सहकारी वाडीवऱ्हे येथील डांग्यासुळका सर करण्यासाठी आले होते . शनिवारी पहाटे येथेदाखल झालेल्या या ग्रुपमधील सहकाऱ्यांनी वाडीवऱ्हेपरिसरातील एका शाळेत मुक्काम केला . सकाळच्या सुमारासगावात चहापाणी केल्यानंतर संदीप व सहकारी सुळक्याकडे गेले . १३५ मीटर उंच असलेल्या सुळक्यावरक्लाइंबिंग करून ते मध्यावर पोहोचले असताना अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढवला . संदीप हीक्लाइंबिंग लीड करत होता त्यामुळे मधमाश्यांचे सर्वात जास्त लक्ष्य तो ठरला . मधमाश्यांचे असंख्य डंख सहन नझाल्याने त्याने आपल्या रोपची क्लिप काढली . त्यामुळे तो थेट ८० फूट खोल दरीत कोसाळला . त्यातच त्याचामृत्यू झाला . त्याचे इतर सहकारीदेखील मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले . मात्र त्यातील एकानेनजीकच्या मोहाळा गावात जाऊन गावकऱ्यांची मदत आणली . तसेच इतरांनी आपल्या मित्र परिवारालाफोनवरून घटनेची माहिती दिली . नाशिक शहरातील वैनतेय या गिर्यारोहण संस्थेच्या संजय अमृतकर , दयानंदकोळी , प्रणव भानोसे , हेमंत पोखरणकर , प्रवण वामनाचारी आणि संतोष चव्हाण यांनाही या घटनेची माहितीमिळाली . ते अॅम्ब्युलन्स व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहचले . जखमींना रात्री उशिरा सिव्हीलहॉस्पिटलमध्ये दाखल केले . रविवारी सकाळी संदीप पाताडेचे पोस्टमार्टम करण्यात आले . त्यानंतर जखमींनापुढील उपचारासाठी ठाण्याला रवाना करण्यात आले . घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये आकस्माकमृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

No comments:
Post a Comment