Wednesday, December 5, 2012

नानेघाट    काही वर्षापूर्वी पावसाळ्यात नानेघाटला गेलओ होतो.नानेघाटला खुप वर्षानी जाण्याचा योग्य आला.कल्याण- मुरबाड करीत एसटीने (जुन्नर कडे जाणारी)प्रवास केला.मालशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानेघाट बसस्थानकावर उतरुन  नानाच्या आगंठ्याच्या दिशेने निघालो.
       
          
पावसाळ्यातला निसर्ग व आताचा वेगळा यात बरेचे वेगळेपण असते.त्यावेळेस डोगंररांगातील धबधबे जोराने वाहत असतात.पण आता कोठेच पाणी दिसत नाही.जंगलातून पुढे जाताना एक गोष्ट निर्दशनात आली.मोठी जगंल तोड झालेली दिसली.दाट जगंल पाहिले होते.हल्ली सगळे उघडे उघडे वाटले.    
                       


     नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापार्‍यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.                                        मजेत गप्पागोष्टी करीत दोन तासात गुहेत पोहचलो.

 
गावातली मुले तेथे गुहेचे व्यवस्था पाहत होते.गुहेला बाहेरुन जाळी लावुन दरवाजा बसवला.ही गुहा संध्याकाळी बंद करतात.गुहा आतून स्वच्छ ठेवलेली आहे.भिंतीवरील शिलालेख   स्पष्ट दिसत आहे.गुहेच्या आत जेवण शिजवणे बंद केले असल्याने आत काजळी होत नाही.कचरा केल्यास तो काढुन   लांब नेउन टाकण्यास सांगतात.असेच सर्व गडावरील गुहा स्थानिकानी व ट्रेकरसनी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत.चाग़ंला   उपक्रम आहे.दुस-यानाही घाण करुन देऊ नये. 


साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे.


चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत.


नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात  पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू  शकतात.सध्या वापरण्यात येणा-या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.
गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात.घाटमाथ्यावर पोहचल्यावर,उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठावर येऊन पोहोचतो.


येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते.


समोर दिसणारे गोरखगड, मच्छिद्रगड , सिध्दगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.


घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणून सांगता येईल. 


 दोन तीन वर्षानतंर एकदा तरी हा ट्रेक करण्यास योग्य आहे.


No comments:

Post a Comment