Saturday, May 11, 2013

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.











शिवनेरीवर सात दरवाजे आहेत,पहिला महादरवाजा,दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा,सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा होय.सात दरवाज्यांच्या वाटेने किल्ल्यावर येतांना पाचव्या दरवाज्यानंतर 'शिवाई देवीचे' मंदिर लागते.






प्राचीन कालखंडापासून शिवनेरी किल्ला विविध राजवटीखाली होता. शक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट तसेच सन ११७० ते १३०८ च्या सुमारास शिवनेरीवर यादवांची सत्ता होती.








गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटले जाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या  गार  पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत.




ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी एका मागोमाग एक असे सात दरवाजे ओलांडावे लागतात. त्यातला पहिला महादरवाजा आहे जो नुकताच पुन्हा बांधला गेला आहे. ह्याचे मूळ स्वरूप कसे होते ते आपल्याला कळत नाही. त्यानंतरचा आहे गणेश किंवा परवानही दरवाजा. ह्याच्या कमानीवर शरभाची, म्हणजे सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची शिल्पे आहेत. डाव्या बाजूला ह्या शरभाच्या पुढच्या उजव्या पायाखाली एक कुत्रा कोरला आहे. तर उजव्या बाजूचा शरभ दोन हत्ती व एक गंडभेरुंड पंजात धरलेला दाखवला आहे.






किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अनुक्रमे सात प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार लाकडी आहे. पाचव्या प्रवेशद्वाराच्या दारांवर अणकुचीदार लोखंडी खिळे बसविण्यात आली आहे.










शिवनेरीचा प्राचीन कालीन किल्ला महाराष्ट्र्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.






सातव्या कुलाबकर दरवाजाने पुढे गेल्यानंतर अंबरखाना लागतो. अंबरखानाच्या जवळच कोळी चौथरा,इदगा तसेच शिवकुंज आहे. शिवकुंजाच्या पुढे  शिवजन्मस्थान आहे. शिवजन्मस्थानाची इमारत दुमजली आहे.इमारतीच्या जवळ ‘बदामी पाण्याचे टाकं’ आहे.किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी आहेत.








शिवनेरीला महाराष्ट्राच्या इतिहासात आगळे स्थान असून याच किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला व येथील वास्तव्यातच त्यांनी स्वराज्याच्या प्रेरणेने बाळकडू मिळाले. शिवाजी महाराजांचे बालपण याच किल्ल्यात व्यतीत झाले.




चौथा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. ह्यावर काही विशेष चिन्हे किंवा शिल्पे दिसत नाहीत. पाचवा दरवाजा संरक्षणाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे बांधला आहे. त्याला नावही तसेच दिले आहे - शिपाई दरवाजा. आक्रमक सैन्याला दरवाज्या समोरच्या दोन चौरस मीटर इतक्या निमुळत्या भागात जावे लागते. हा भाग तीन बाजूंनी उंच भिंतींनी वेढला आहे. इथे एक क्षणभरही थांबले तर वरून बाणांचा व उकळत्या पाण्याचा वर्षाव सहज करता येऊ शकतो.










गडाचा आकार बाणाच्या अग्रासारखा निमुळता व त्याचे अग्रटोक उत्तरेकडे रोखलेले आहे. उत्तर कडयाच्या टोकास कडेलोट टोक असे म्हणतात.







शिपाई दरवाज्यानंतर आपल्याला शिवाईदेवीच्या मंदिराकडे उजव्या बाजूला वळता येते. त्याऐवजी सरळ गेले तर आपण फाटक किंवा मेणा दरवाज्याकडे जातो. त्यानंतर पुढे कुलाबकर किंवा कुलुप दरवाजा लागतो. हा सातवा दरवाजा असल्यामुळे हा दरवाजा पडला की गडाचे कुलुप उघडले म्हणून बहुदा ह्याला असे नाव मिळाले असावे. ह्या सगळ्या दरवाज्यांमुळे हा गड अत्यंत बळकट मानला गेला.



                                                          शिवाजी महाराज्यांचे जन्मस्थान









गडावर जायला दोन मार्ग आहेत. पहिला डांबरी रस्त्याने गेल्यावर मुख्य दरवाज्याने वर जाणारा आहे. ह्या वाटेने माथ्यावर जायला एकूण सात दरवाजे ओलांडावे लागतात.







हा  किल्ला जरी उंचीला फार नसला तरी ह्याला सर्व बाजूंनी ३०-४० मीटरच्या कातळकड्यांचे उत्तम चिलखत लाभले आहे. ह्या नैसर्गिक संरक्षणामुले त्याला काही ठिकाणीच तटबंदी बांधावी लागली आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ११०० मीटर व पायथ्यापासून साधारण २५० ते ३०० मीटर उंच आहे.




गडावर जायला दुसरा मार्ग त्या मानाने जरा अवघड आहे. त्याला साखळीची वाट म्हणतात. पूर्वेकडून असलेली ही वाट गडाच्या लांबीच्या साधारण मध्यावरून सुरू होते व कातळकड्यातील गुहांच्या दिशेने वर जाते. इथे कातळात खोदलेल्या निमुळत्या पायऱ्यांवरून काही अंतर कापावे लागते. हा भाग थोडा धोक्याचा आहे. इथे आधारासाठी काही साखळ्या लावल्या आहेत त्यामुळे ह्याला साखळीची वाट असे नाव मिळाले आहे. पटकन वर किंवा खाली जाण्यासाठी ही वाट उपयुक्त आहे त्यामुळे आक्रमणाच्या वेळी पळून जाण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे.










किल्ल्याची उंची: ३५०० मीटर किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग 



राज्य बळकट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुमारे पाचशेच्या वर लहान-मोठे भुईकोट, डोंगरी आणि सागरी किल्ल्यांची शृंखला उभारली. गडकोटांना आपले "प्राणसंरक्षक' मानणाऱ्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची राजकीय आणि सामाजिक अनास्थेमुळे दुरवस्था होऊन ते शेवटच्या घटका मोजत आहेत. पुढील पिढ्यांना महाराजांचा जाज्वल्य इतिहास समजण्यासाठी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचेच आहे. 

1 comment:

  1. छत्रपती शिवरायांचा इतिहास जपन्यासाठी किल्ला चांगल्या स्थितीत असायला पाहिजे.

    ReplyDelete