Thursday, August 30, 2012

माणिकगड


पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची पावले शहराबाहेर वळतात. त्यांची विटलेली मने निसर्गाकडे धाव घेतात.
गेल्या काही वर्षांत निसर्गाकडे पळण्याची शहरवासीयांची वृत्ती इतकी वाढली आहे. कणखर काळ्या मातीची आणि ओबडधोबड दगडांची ही भूमी वर्षाऋतूत हिरवाईने नटून जाते आणि तिच्या कडेकपारीतले झरे जिवंत होऊन धबाधब कोसळू लागतात.गडांच्या तटबंदीना हिरवा साज येतो.ट्रेकर गडांच्या दिशेने सुटतात.गर्दी कमी असलेला माणिक गडावर जाण्याचा योग आला. पनवेल येथुन 'वाशिवली' एसटी पकडुन 'वडगांव' फाट्यावर उतरुन चढाई सुरु होते.
मार्ग मस्त जंगलातुन आहे.गडाला फेरी मारुन गडावर चढण्यचा मार्ग आहे. पावसाने सपुर्ण ट्रेक मघ्ये झोडपुन काढल्याने फोटॉ काढता आले नाही.तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पाय-या आहेत.येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात.त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात.येथून डावीकडे फुटणा-या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते.
टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे. श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्याने सर्वाना पिंडीची पुजा केली.आरती केली.प्रसाद वाटला.मन प्रसन्न झाले. धुक्यात झालेली हि वेग़ळीच पुजा लक्षात राहील.

                                    मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला       दिसतात.प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,माथेरान,कर्नाळा,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात.येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.किल्ल्यावरून प्रबळगड,इरशाळगड,कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो.धुके असल्याने आम्ही कोणत्याचे गडाचे दर्शन घेऊ शकलो नाही.संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.उंची :  २५०० फूट
प्रकार  :   गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी :  मध्यम
ठिकाण :  रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव :  वडगाव
डोंगररांग  : कर्जत पनवेल

माणिक गडाचा ट्रेक मजेशीर आहे.

 या लिन्कवर ट्रेकचे आणखी फोटॉ पाहण्यास मिळतील.
https://picasaweb.google.com/111188254265652601881/ManikgadTrek?locked=true&feat=email

No comments:

Post a Comment