कोकण दौ-यात सिंधुदुर्ग करून आम्ही विजयदुर्गाकडे कूच केली.दुर्ग व किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.मराठयांच्या अनेक विजयी लढाया अनुभवलेला जलदुर्ग विजयदुर्ग प्रत्येक इतिहासप्रेमींच्या हृदयात म्हणूनच मानाचं पान आहे.असाच हा विजयदुर्ग,सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे.पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला.किल्ला अजून खूपच चांगल्या अवस्थेत आहे.
सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या पराक्रमात अनेक गोष्टींबरोबर येथील दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. येथील बलाढय़ आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे.
त्यासाठी काळोख्या रात्री अतिशय गुप्तपणे ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन युद्धनौका त्यासाठी पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. या भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली उभारलेली आहे. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या. त्या काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.
मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज, डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…
इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.असा इतिहास आहे ह्या किल्ल्याचा.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५ एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले. यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला ‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता. इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा दरवाजा लागतो.
१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी दरवाजा!
दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की, किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे आहेत.
या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा! शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान, ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!…
शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची. वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.
ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला ‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे.
या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
जयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
No comments:
Post a Comment