यावर्षीचा पहीला ट्रेक रविवार दिनांक ९ जानेवारी २०११ रोजी 'पेब' या किल्ल्यावर केला.मस्त वातावरण असल्याने ट्रेकला हजेरी वाढली होती.नवख्या ट्रेकर ना या गडावर नेल्यास त्यांची ट्रेकींगची आवड वाढु शकते.

नेरळ वरून चालत पायथ्याला पोहोचलो आणि "introduction" आटपून घेतलं.पहील्यांदाच ट्रेक आलेल्यांचे स्वागत केले.समोर पेबचा कडा दिसत होता तर डावीकडे माथेरान.गाणी गात थट्टा मसस्क्री सगळे एकदाचे पोहोचले त्या टेकाडावर. समोर एक भलामोठा विद्युतखांब होता. चढल्यावर त्याशेजारी डाव्याबाजूला गर्द झाडी होती. त्या झादीच्या उंबरठ्यावर असलेल्या सावलीत आम्ही विसावलो. चिवडा फरसाण खाल्लं आणि पुढची वाट पकडली. आता ठरवला की थांबायचं ते सरळ गडावर पोहोचूनच.
उन्हं तापू लागली होती पण हवेत गारवा होता न डोक्यावर सावली. हवेत गारवा असल्याने सुखद वाटत होते जास्त चढही नव्हता. गप्पा मारत जंगलाची मजा लुटत आमचे टोळके चालत होते. काहीवेळाने आम्ही त्या झाडीतून बाहेर आलो आणि गडावर चढणं सुरु झाले.वाटेत एक मोठा झाड दिसले. त्याच्या डोहात ३-४ जण आरामात राहतील इतकी जागा होती.
या गडाला बिकटगड का म्हणतात ते आम्हाला चांगलंच कळत होतं.पहिलाच चढ छातीवर घेऊन आम्ही कुठे थोडा वर पोहोचतोय तोवर एक सुकलेला ओढा खाली आलेला दिसत होता. त्या ओढ्यातूनच वर चढायचे ठरले.थकून भागून ओरखडे झेलून 'नाखीण' आणि 'पेब'च्या खिडींत पोहोचलो.उन्हामुळे व थडीं कमीझाल्याने खुपच थकवा आला.खिडींत वर पोहचल्यानतंर पश्र्चिमेचा भाग दिसला आणि थकवा दुर झाला.
छोटासा राँकपँच सर्वाना चढवत काही वेळातच गुहेत पोहोचलो.
इथून समोर म्हसमाळ डोंगर दिसत होतं.लांब धुक्यात मलंड आणि चंदेरी सुद्धा साद घालत होते. हे दृश्य मनोमन पाहून थोडे विसावलो. काही फोटो काढले आणि डबे उघडले. पुलाव, इडली, पोहे, ठेपले, चपात्या, ब्रेंड, मसाले भात,अंडी, लसून चटणी, "garlic rice",आणि विविध प्रकारची लोणची अशी मेजवानी मांडली होती.हे जेवण स्वाहा केलं.गडाची माहितीचे "printouts" मित्राने सगळ्यांना वाचून दाखवले. दमलेल्या मडंळीनी गुहेत आराम करण्याचे ठरविले तर इतर मडंळी शिडीचढुन गडावर फिरायला गेली.तरुण मडंळी भुयार पाहण्यात गुतंले होते.

परतीचा प्रवास मजेत केला व पुढच्या ट्रेकची आखणी केली.
No comments:
Post a Comment