Monday, September 10, 2012

कळसूबाई


   कळसूबाई ह्या सह्याद्रीतल्या सर्वौच्च शिखरावर काही वर्षीपूर्वी गेलो होतो.मित्रांसह हे शिखर पुन्हा पादाक्रांत करण्याचा योग आला.मागे पावसाळ्यात गेलो होतो.
ढगात लपलेल्या ह्या शिखरावरुन जोरात वाहणा-या वा-यात उभे राहणे कठीण असते.त्यामुळे या शिखराची उंची कळली नव्ह्ती.पण आता हिवाळ्यात गेल्याने शिखरावरुन बाजुचा परीसर पाहु शकलो.
बारी गांवात कांदेपोहे व चहा घेउन मावळे वाटेला लागले.सर्वजण उत्साहाच्या भरात चढत होते.काही वेळातच  थोरल्या कळसुबाई च्या मंदीरात पोहचलो.ज्या  मडंळीना वर चढता येत नाही त्या मडंळीना या थोरल्या कळसुबाई चे दर्शन घेता येते.थोरल्या कळसुबाई चे दर्शन घेऊन पुढे निघालो.दोन उभ्या शिड्यावरुन चढत पठारावर पोहचलो. खाली शेती व गावे लहान लहान दिसत होते.छोटीशी विश्रांती घेऊन पुढच्या टप्या चढ्ण्यास सुरुवात केली.

 
   मघ्ये एका विहीरीवर पाणी पिऊन व बाजेच्या टपरीवर भजी व चहा घेऊन शेवटची शिडी चढ्ण्यास निघालो.आता अंतिम शिखर समोर दिसत असल्याने सगळ्याना हुरुप आला होता.

हवेत गारवा असल्याने चढताना थकवा जाणवत नव्हता.येथून कातळकड्याच्या पायथ्याशी पोचल्यावर कडा चढण्यासाठी लोखंडी शिडी आहे.


शेवटीची शिडी पटकन चढलो व शिखर सर केल्याचा आनंद मित्रांच्या चेह-यावर दिसत होता.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट काबीज केल्याने मावळे मडंळी खुष झाली.
 

  गिर्यारोहकांचे आकर्षण असलेले हे शिखर आरोहणास अतिशय अवघड पण चित्तवृत्तींना सुखावणारे,सह्याद्रीच्या रांगांमधील सर्वात उंच शिखर आहे.

माथ्यावरुन कळसूबाई मंदिर असून वरून त्रिंबक रांग, कुलंग, अलंग, मदनगड, हरिश्चंद्रगड, भंडारदरा तलाव आदींचे विलोभनीय दृश्य दिसते.   

शिखराची उंची १६४६ मी.

No comments:

Post a Comment