Thursday, September 13, 2012

रतनवारी

कळसुबाई उतरुन रतनगडावर जाण्यासाठी निघालो.सुर्य मावळतीला लागला होता.भंडारदरा घरणाच्या बाजुने वळसा घालुन रतनवाडी येथे पोहचलो.पुरातन अतिशय सुंदर कोरीव काम असलेले अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले.भंडारदरा धरण पूर्ण भरते तेव्हा या मंदिरातील शंकराची पिंड पूर्णतः पाण्याखाली जाते राहण्याची व खाण्याची सोय काय होते पाहण्यास सुरुवात केली.श्री.संदीप झडे यांच्या 'हाँटेल प्रवरा' '7798176499'-'9049318557'येथे राहण्याची व जेवणाची सोय केली.रात्री जेवलो व शेकोटी केली.थंडी जोरात असल्याने सर्वाना चागंलीच थंडी लागली.





            
 पहाटे उठुन चहापाणी करुन गडावर निघालो.'जय भवानी जय शिवाजी' घोष करीत सगळ्यानी सँक उचलल्या.कोणताही गड असो, कोणाचाही उत्साह कमी होत नाही.सुरुवातीला साधारण अर्धा पाउण किलोमीटर अंतर नदीकीनारून चालत पुढे गेल्यावर खरी चढण सुरु होते. जंगल सुरु झाल्यावर खरी मजा आली.


 
चढामुळे थकवा जाणवायला लागला होता. झाडाझुडपातून व तुटलेल्या फांद्यांवरून वाटेतून रस्ता काढत काढत आम्ही वर चढत होतो.थोडा जंगलातून बाहेर आल्यासारख वाटल. थोडा मोकळ वातावरण होते.शेवटी आम्हाला गडावर जाणा-या शिडया दिसल्याने "हर हर महादेव" चा अजून एक गजर झाला.




         
   डुगडुगणारी शिडी, ९० अंशामध्ये हलणारा कठडा, अरुंद पाय-या कशाची परवा न करता आम्ही वर चढलो.
गुहेतील रत्नादेवीचे दर्शन घेतले.भगवा झेंडा लावला.गुहेत थोडा वेळ आराम केला आणि गड बघायला निघालो.




  प्रवेशद्वाराने प्रवेश करीत पुढे गेलो.गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात.त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे.याला राणीचा  हुडा म्हणतात. 


 
कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते.
रतनगडाच्या उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला   खिळवून ठेवते.   लंग,   मदन,अलंगडाबरोबर       महाराष्ट्राचे  उत्तुंग   शिखर   कळसूबाईचे दर्शन घेवून   आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो.







नेढे म्हणजे  डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना  नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो.या नेढय़ातून भन्नाट वाहणार्‍या वार्‍याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो. 

                                                                                                                                                                                           




















गडावरुन समोर भंडारदरा धरणाचा जलाशय,प्रवरा नदी,पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्‍या क्रमांकचे पठार असलेले  घनचक्करचे पठार उत्तम दिसते. 





    दोन डोगंराच्या मघुन कातळात कोरलेला त्रंबक दरवाजातुन कातळात कोरलेल्या पाय-या उतरत खाली उतरलो.

No comments:

Post a Comment