Sunday, September 16, 2012

सरसगड

श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे.येथील गणपती'बल्लाळेश्र्वर' म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या  गडाचे दर्शन होते.गडाचा आकार 'बल्लाळेश्र्वर'या गणपतीसारखा दिसतो.
                                                                                                                                                                                          पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे.या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते.
















 
शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले.






नवीन वर्षाच्या ट्रेकींगची सुरुवात गणेशाचे (बल्लाळेश्र्वर) दर्शनाने केली.सोळा जणानी  "गणपती बाप्पा मोरया" व 'जय भवानी जय शिवाजी'या धोषणा देत गड चढायला सुरुवात केली.



हवेत थंडी असल्याने गारवा होता. पटापट चढत गेलो. गडावर जाण्यासाठी ९६ पाय-या चढावयास लागतात.पावसाळ्यात वाटा  खुप निसरड्या असतात.गड छोटासा पण मस्त आहे.


 


पाली गावाहून दिंडी दरवाजापर्यंत जायला साधारण १ तास लागतो.


गडावर केदारेश्र्वराचे मंदिर आहे.महाशिवरात्रीला केदारेश्र्वराला भाविकांची गर्दी असते.  येथे एक तलाव आहे. हळणीसाठी दोन बुरूज आहेत. मात्र या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो.


समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभुळपाडा असा सर्व परिसर दिसतो.













गडावर जाण्यासाठी मात्र 'दिंडी' दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते.मंदिराच्या मागील बाजूस असणा-या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. 


 


बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेक-यांना रहाण्यासाठी होत असे.


















पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पाय-या चढाव्या लागतात. या पाय-या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो.पाय-यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पाय-या    आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच  पहारेक-यांच्या देवडया आहेत. 






गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती  वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी करत नाही.

No comments:

Post a Comment