Thursday, December 20, 2012

जिवधन




      नानेघाट चढुन गेल्यावर उजवीकडे जिवधन गडाचे दर्शन होते.शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.पायथ्याशी घाटघर हे गाव आहे.माळशेज घाट, भोरांड्याचे दार, नाणेघाट, गुणाघाट, दर्याघाट, आंबोळीघाट, पिँपरीघाट आदी घाटावरुन देशावर येता येते. या घाटांच्या माळेत नाणेघाट फार महत्वाचा. घाटघरला या घाटाचे घर म्हणुन घाटघर असे म्हणतात.

                                                         



     पहाटे थंडीतून कुडकुडत किल्ल्याकडे प्रस्थान केले.मंद प्रकाशात चालताना मजा येत होती.सुरुवाती उभी चढ थंड्  वातावरणात पटापट चढलो.पहिल्या पाय-या व नतंर राँकपँच चढण्यास थोडा वेळ गेला.सगळ्या संवगड्याना वर घेत गडावर पोहचलो.


                                            





 गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धाता या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.




                                   

  गावातून बांधून आणलेले कांदेपोहे खाल्ले.पाण्य़ाच्या टाक्यातले थंडगार पाणी प्यायलो.पुढची वाटचाल सुरु केली.


                                           




पाण्य़ाच्या टाक्यातील पाण्यावर उगवलेली सुंदर पानवनस्पती 


                                          

  


  गडावर फेरी मारली.गडावर खुपश्या गडांचे दर्शन होते. आजुबाजूला दिमाखात उभ्या असलेल्या शिवनेरी,हडसर,चावंड व जिवधन या चार किल्ल्यांच्या मिलापाने नाणेघाटाची संरक्षक फ़ळी बनलेली आहे. 









    गडावरुन  नानाचा आंगठा दिसतो.   




   
    
   गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. गडावरचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यापासुन सुटावलेला वानरलिंगी उर्फ खडा पारशी सुळका. 
         

                                              

जवळपास किल्ल्याच्याच उंचीचा असलेला हा सुळका अन मुख्य किल्ला यांच्यामध्ये खोल दरी आहे. सुळक्याची उंची एव्हढी होती की वरुन त्याचा पायथा दिसत नव्हता.










  गडाचा महादरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. किल्ल्याचा हा दरवाजा दोन कातळभिंतीच्या मध्ये खुबीने बनवलेला आहे. इंग्रजांनी केलेल्या नासधुसीमुळे पुर्ण दरवाजा वर पर्यत दगड मातीने चिणुन गेलेला होता. वाकुन दरवाजा पार केला. 




  
  किल्ल्याच्या दुसर्‍या बाजुच्या महादरवाज्याने उतरताना दुसरा राँकपँच पार करावा लागतो.दुसरा ग्रुप तेथे उतरत होता.त्याच्यासह आम्ही पटापट उड्या मार्त खाली उतरलो. कातळात कोरलेल्या पाय-या उतरत सुळक्याच्या खाली आलो. 







   किल्ल्याच्या खाली चांगले जंगल आहे.लाड्क़े तोडण्यास आलेली गावकरी मडंळी भेटली.सरळ घाटघर गाठ्ले. झुणका भाकरी खाल्ली व मुंबईला निघालो.











सह्याद्रीच्या डोंगररांगातील नाणेघाटाजवळच्या जिवधन किल्ल्यावर अडकलेल्या सहा पर्यटकांची 18 तासानंतर यशस्वी सुटका करण्यात आली. जिवधन दुर्ग चढण्यास प्रारंभ केला होता. जिवधनची अर्धी चढत चढून गेल्यानंतर रात्री अंधारामुळे हे पर्यटक भरकटले.किल्ल्यावर जाणारी नेहमीची पायवाट सोडून चुकीच्या बाजूला चालत गेल्याने धोकादायक उंच कड्यावरच्या टोकावर हे पर्यटक अडकले. त्यातच रात्री पाऊस झाल्याने रस्ता निसरडा झाला. येण्यास वाट नसल्याने त्यांनी एका कपारीच्या आडोशाने रात्र काढली. सकाळच्या वेळी जिवधनवर मुक्कामी असलेल्या दुसर्‍या पर्यटकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पुण्यातील गिर्यारोहकांशी संपर्क साधून ही माहिती दिली. जुन्नरमधील सहय़ाद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पथकांनी दोरांच्या साहाय्याने ‘सेल्फ कटिंग’ करून या अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली.








No comments:

Post a Comment