Wednesday, February 27, 2013

केंजळगडसव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्र्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे.केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.


रोहिडाची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठा पहाडाच्या डोक्यावर गांधी

टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो.गांधीटोपी सारखा असणारा केंजळगडरोहिड्यानतंर रायरेश्वरात २६ जानेवारीचा झेंडावंदन करुन केंजळगडावर निघालो.एखाद्या हत्यारबंद शिलेदाराप्रमाणे रायरेश्वराच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेला केंजळगड.रायरेश्वरच्या पूर्वेला जवळ केंजळगड आहे. येथील अखंड पाषाण मध्ये खोदलेल्या ५२ पायरया प्रेक्षणीय आहेत. केंजळगडाच्या कडाच्या पोटात गुहा, पाण्याची टाके आहेत.पायरया ह्या दगडातच रेखाटल्या आहेत
           

केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही

                                                       उघड्यावर असलेल्या देवीच्या मुर्त्त्या

                                                                      एक चुन्याचा घाणा
                                                 छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती

गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते.


या दुर्गानीच औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.
एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.
'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'


                          अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो

                                                                      दारूचे कोठार
गडावरुन तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात.
केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर  धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे


                                                                 केंजळगडाचा नकाशा

किल्ल्याची उंची : ४२६९ फूट      किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग      डोंगररांगः महाबळेश्वर                          
जिल्हा : सातारा    श्रेणी : मध्यम

No comments:

Post a Comment