Monday, February 4, 2013

रोहीडा किल्ला

        २५,२६ व २७ जानेवारीला जोडून सुट्या आल्याने रोहीडा,रायरेश्वर,केंजळगड व कमळगड असा ट्रेक
ठरविला.मित्रमंडळी जमली.ट्रेकची आखणी झाली.सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्र्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग असल्याने हा ट्रेक आखला. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.







पुणे ते  भोर प्रवास करीत बाजारवाडीत पहाटेच पोहचलो.ओळख परेड खाल्यावर सुचना देण्यात आल्या.व चढाईला सुरुवात केली.थंड वातावरण असल्याने चढाई जोरात झाली.प्रसन्न सुर्योदय झाल्यावर गडावर चढण्यास उत्साह वाढला.











डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खो-यात वसलेला किल्ला म्हणजेच 'किल्ले रोहीडा'.
रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खो-याच्या काही भागात वसलेले आहे.







या किल्ल्यावरील तीस-या दरवाजावर असणा-या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते.








पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे.याचे पाणी बाराही महिने पुरते.








येथून ५-७ पाय-या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर ब-याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या  तटबंदीची पडझड झाली आहे.










                             ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे.








किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व
पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत.









                            गडाचे बुरुज शाबूत असल्याने गडावर फिरण्यास मजा येते.





रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर  लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत.









संपूर्ण गड फिरण्यास दीड तास लगतो.मग तिन्ही दरवाजे खाली उतरून उजव्या बाजुच्या वाटेने 
नाझेरे,आंबवडे करीत कोर्ले गावाकडे वाटचाल सुरु केली. 





किल्ल्याची उंची : ३६६० फूट          किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग           डोंगररांगः महाबळेश्र्वर
जिल्हा : सातारा     श्रेणी : मध्यम

No comments:

Post a Comment