Monday, February 4, 2013

रायरेश्वराचे पठार


      रोहिड्या हुन नाझरे गावात उतरलो.तसेच पुढे आंबवडे गावात पोहचलो.तेथे नागेश्वराचे मंदीरात जेवण केले.नागेश्वर    मंदिराचा  परीसर निर्सगरम्य फारच सुंदर आहे.जुना पुरातन झुलता पुल पाहिला.तेथून एसटी बसने कोर्ले गाव गाठले.चहापाणी करून चढाई सुरु केली.उन्हे चढल्याने त्रास जाणवत होता.निलगीरी झाडाची सावली मिळत होती.

 
सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार.
  दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.


                              शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर. 

                                                           रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर 
  
  वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले


                                         रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
                                         तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
                                         आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
                                         एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
                                         देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
                                          मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।
  

.खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
 

 सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
 

शनिवारी २६ जनेवारीला आम्ही गावातल्या शाळेतील झेंडावदन कार्यक्रामात भाग घेतला.मुलाना झेंडे ,फुगे व खाउ वाटला.मुलानी आमचे स्वागत केले.रायरेश्वरातला झेंडावदनाचा कार्यक्रम कायम स्मरणात राहील.


भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग    डोंगररांगः वाई - सातारा     जिल्हा : पुणे   
श्रेणी : सोपी         किल्ल्याची उंची : ४०००फुटरायरेश्वर येथे  राहण्यासाठी व जेवणाची सोय                     

श्री.शंकर जंगम (९६८९६८८४९७ व ९७६३०१८२७९)
श्री.गोपाळ जंगम (९३७०७१७६३४) 


यांच्याकडे होते.

No comments:

Post a Comment