Monday, September 22, 2014

सुधागडावरील पदभ्रमण


                                                 सुधागडावरील पदभ्रमण


सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे.


अष्टविनायक बळालेश्वरांचे दर्शन घेऊन पाच्छापुरच्या पुढे डोंगरवाडीतून गड च्डह्ण्यास सुरुवात केली.उन वाढले होते.थोडे चढल्यावर दम लागु लागला. आता पाउस यावा असे वाटू लागले.आमचे पावसाणे जणू एकले आणि पाउसाने आम्हाला साथ देण्याचे ठरविले.

लोखंडी शिडीशिवाय गड चढणं जरा अवघडच आहे.


राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता. पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात.सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.


या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले.रायगड जिल्हयात पाली पासून जवळ आहे.


गडावरून दिसणारा ’ तैल बैला ’


भोराई मातेचं मंदिर
समोरच एक दीपमाळ  दिसते आणि त्यावर एक हत्ती कोरला आहे त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवलेली आहे. अशी दीपमाळ मी पहिल्यांदाच पाहिली. मंदिरात प्रवेश केला,मंदिरात भली मोठी घंटा आहे.  देवीच दर्शन घेतले.जागृत देव्स्थान आहे.नवरात्रात खुप मंडळी गडावर देवीच्या दर्शनास येतात.
अगदी रायगड सारखाच तसाच हुबेहूब महादरवाजा किल्ले सुधागडचा हि दिसून आला. आत शिरल्यावर तटबंदीची थोडी पडझड दिसून आली. महादरवाजाच्या वरती चढून आपोआप मुखातून एक शिवगर्जना झाली. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि. आणि बाकीच्या सर्वांनी जय असा मोठा आवाज केला.
हनुमानाचे मंदीर
वाटेत हनुमान मंदिर लागले. एका भल्या मोठ्या झाडाखाली एखादा तपस्वी भासावा असा हा मारुतीरायाचा अवतार. बाजूने पडझड झालेला कठडा, भिंती आणि मध्ये हि असणारी मारुती रायांची मूर्ती मनाला खूप शांती आणि चैतन्यदायी शक्ती देवून जाते.


गडावरील तलावसुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. पैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात.

तानाजी टाके म्हणून एक तानाजी तलाव लागलं. एका भल्या मोठ्या पाषाणी दगडात कोरलेल्या/खोदलेल्या या तलावातले थंड पाणी प्राशन केलं. आणि विसावा घेतला एक नवल वाटलं हे बांधकाम कौशल्य पाहून काय योजना असेल हा किल्ला बांधताना एका दगडात तलाव खोदने हे काय साधेसुदे काम नाहीय.
पंत सचिवांचा वाड्याच्या बाजुला एका छोट्या घरात, वाड्याची देखभाल करणारी मामी राहते. ही वयस्क असली तरी पूर्ण वाड्यात शेण सारावण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. येणाऱ्या दुर्गाप्रेमिनी हा वाडा साफ ठेवणे अध्यारुतच आहे.


टकमक टोक, शिव मंदिर, बांधीव टाकी, पूर्वेकडील बुरुज, गोमुख असलेलेर टोक, विशाल कोठारे संपूर्ण सुधागड एक परिपूर्णतेच प्रतिक वाटतो. सपाट पठार व त्यावरील असणारी तलाव हे पाहून निसर्गाच एक वरदान त्या दुर्ग दुर्गेश्वाराला लाभलेलं दिसून आलं.                                                          गडावरचे सोबती.

No comments:

Post a Comment