Wednesday, December 31, 2014

दारू पिऊन गाईडगिरी.

मित्रमंडळीसह कोकणात फिरण्यास गेलो होतो. कुडाळ, वेगुर्ला, मालवण करीत देवगडला आलो.विजयदुर्ग पाहण्यास निघालो.मला या दुर्गाला भेट देण्याचे संघी मिळाली नव्हती म्ह्णुन मला तेथे जाण्याची खूप घाई झाली होती.तेथे जाताना प्रथम रामेश्वराचे दर्शन घेऊन विजयदुर्गाला पोहचलो.किल्ल्यापासून जवळच ६-७ किमी च्या अंतरात श्रीदेव रामेश्वराचे जमीन पोखरून तयार झालेल्या जागेत बांधलेले भव्य मंदिर आहे. 


पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला.मराठ्यांच्या काळात कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.


   आमची मंडळी विजयदुर्गाच्या प्रवेशव्दाराशी पोहचल्यानतंर तेथे गाईड मंडळी जमली. आमच्या मित्रमंडळीना दुर्गाची माहीती कायची असल्याने त्यांनी एका गाईडाला ठरवले. मी व माझा मुलगा पाठीमागेच दुर्गाचे फोटो काढित होतो.आम्ही फोटो काढीत प्रवेशव्दारातून आत शिरतानाच तो गाईड विजयदुर्गाची इतिहास देत असलेले आम्ही पाहिले.त्या गाईडला आम्ही दोघे याच ग्रुपचे असल्याचे कळल्याने त्यांनी इतिहास एकण्याची विनंती केली. आम्ही  फोटो काढित असताना आम्ही ऐकतो आहोत असे सांगून मी पुढे गेलो. तेथे गर्दी नसल्याने शांतता होती.त्यामुळे तो सांगत असलेली माहीती लांबूनही ऐकण्यास येत होती.पण आम्ही फोटो काढण्यात गुंग असल्याने त्यांच्याकडे लक्ष नव्हते. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबत खाना, साहेबाचे ओटे तसेच दोन भुयारी मार्ग अशी पाह्ण्यासारखी ठिकाणे आहेत. पाण्याखाली बांधलेली भिंत ही ह्या किल्याची खासियत असून ही भिंत शत्रूच्या मोठ्या जहाजांपासून किल्याची राखण करत होती.संकटाच्या वेळी किल्ल्यावरुन सुखरुप निसटून जाण्यासाठी मुख्य बालेकिल्ला ते विजयदुर्ग गावातील धुळपांच्या वाड्यापर्यंत भुयारी मार्ग आहे.गडाचे महत्व ओळखून,मराठ्यांचे आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांनी आरमाराचे मुख्य केंद्र म्हणून या गडाची निवड केली होती. तो गाईड ही माहीती देत देत   जाखीणीच्या  तोफेपर्यत  पोहचला. त्याचे काम संपले असे जाहीर करून तो  निघत होता. आमच्या मंडळीनी सर्वाचा निरोप घेण्यासाठी त्याला प्रवेशव्दारापाशी आणले.त्यावेळी तो सर्वाशी हस्तालोदंन करीत करीत माझ्या जवळ आला. तो जवळ आल्याबरोबर मला दारूचा वास आला.मी चकित झालो.माझ्या मित्राना बाजूला घेऊन मी विचारले ’हा गाईड दारू प्यायलेला आहे का?’.मित्र म्हणाले ’ होय आम्हाला माहीत आहे’. मी मित्रांवर रागावलो.दारु प्यायलेल्या गाईडकरून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत होतात. महिलांनाही बडबडलो.   मला     अगोदर     सांगितले   असतेत तर आम्ही त्याला तेथून हाकलून लावला असता.मला त्या गाईड भंयकर राग आला होता.
प्रवेशव्दारापाशी आल्यावर तेथे दुसरे गाईड होते त्यांच्याकडे त्या दारु प्यायलेल्या गाईडबद्द्ल चौकशी केली.त्याला आम्ही सांगितले पण ऐकत नाही असे त्यांचे म्हणणे होते.ते मलाच त्याची तक्रार करण्यास सांगू लागले.   त्यांच्या ओळखपत्रावर  'संतोष पवार '  असे नाव होते.तेवढयात तो गाईड जवळ आला. मी त्याला त्याच्या दारू पिऊन गाइडचे काम करण्याबद्द्ल खूप बडबडलो.चांगलाच झापला. दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास  सांगण्याची हिंमत कशी झाली? तसा तो थोडासा घाबरला होता. त्याला दारू न पिता गाईड चे काम करण्यास सांगून आम्ही विजयदुर्गाहून पुढे निघालो.


  परदेशातून व इतर राज्यातील मंडळी विजयदुर्ग पाहण्यास येतात त्यावेळी याने दारू पिऊन महाराजांचा इतिहास त्यांच्यासमोर मांडला तर त्यांचा यांच्या म्हणण्यावर विश्वास बसेल काय?त्यांना काय वाटेल?


 विजयदुर्ग गाईड कमीटी असेल तर त्यांनी अशा गाईड तेथे काम करण्यास परवाणगी देऊ नये. महाराष्ट्रातील किल्ले व दुर्ग सरकार लक्ष देत नसल्याने ढासळ आहेत.पण दारू पिऊन चुकीचा इतिहास सांगून महाराजांची महती कमी करू नका.


  आपल्यालाही गडांवर असे गाईड भेटल्यास त्यांना तंबी द्द्या.      

No comments:

Post a Comment