काही दिवसापूर्वी मित्रमंडळीस ’सांधण व्हॅली’ येथे जाण्यास रात्री बारा सुमारास खाजगी वाहनाने ठाण्याहून निधाले.गप्पा करीत करीत इगतरपूरी पर्यत प्रवास हायवेने सुरु केला.रात्र असल्याने रस्ता दाखवण्यास कोणीच नव्हते.मग मोबाईलवरील गुगल मॅपवर ’साम्रद’ ह्या ’सांधण व्हॅली’ जवळील गावाची नाव नोंद केली.’नेट’ व ’जीपीआरएस’ सुरु केले.मोबईलवरील या अॅपने मार्ग दाखवण्यास सुरुवात केली.नाशिक हायवे सोडून ’भंडारदरा’च्या मार्गाकडे वळण्याची पहिली सुचना मिळाली.पुढे प्रत्येक वळणावर पूर्वसुचना मिळत होती.गाडीच्या वेगात ’साम्रद’ या गावी किती वाजता पोहचणार व अजून किती अंतर कापायचे आहे याची माहीती मिळत होती.
किर्र रात्र होती.रस्त्याला चिटपाखरु दिसत नव्हते.चालकाला रस्त्याची माहीती नसल्याने त्याला मोबाईल पाहून रस्त्याची माहीती देत होता.रस्त्याच्या बाजुला असलेल्या काही ठिकाणांची माहीती दाखवण्यात येते.यावरून आपण आपला मार्ग योग्य दिशेने जात असल्याची खात्री करु शकतो.चालकालाही रस्त्यावरच्या छोट्याछोट्या नोंदी पाहून आश्चर्य वाटले.पुढे येणा-या गावाची नोंद व अंतर याचीही माहीती दिली जाते.यावरून आपला प्रवास योग्य दिशेन सुरु आहे याची खात्री पटते.रस्ता दोन भागात विभागत असेल तर आपण कोणत्या मार्गाने जायाचे याची पूर्व सुचना शंभर मीटर अगोदर दिली जाते.
या अॅपच्या साहाय्याने आम्ही सगळे चार वाजता ’साम्रद’ गावी सुखरुप पोहचलो.पोहचल्यावर आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहचला आहात असे सांगितले गेले.मोबाईलवरील या अॅपची मदत झाली नसती तर रस्त्याच कोठेतरी थांबून पहाटे प्रवास करावा लागला असता.रात्री रस्ता शोधणे कठीण झाले असते.गावातल्या मंडळी इतक्या रात्री कसे काय पोहचलात याची पिचारपूस केली.
गुगल मॅप या अॅपने निर्धास्त प्रवास करु शकतो याची प्रचिती आली.खूप जणांनी हे अॅपच्या मदतीने प्रवासही केला असेल.पण ज्या मंडळीना यांची माहीती नसले त्यांच्यासाठी ही माहीती पुरवली आहे.
आपल्या ट्रेकर मंडळीना एक विंनती आहे या ’गुगल मॅप’वर गडाच्या ठिकाणांच्या नावाची नोंद केल्यास तेथे जाण्यास सर्व ट्रेकरना मदत होईल.
No comments:
Post a Comment