Thursday, July 2, 2015

माथेरान व्हाया दोधानी (पनवेल) ट्रेक


दरवर्षी पावसाळ्यात आम्ही  हा ट्रेक करतो. जाण्य़ास येण्यास सोयीचा व ग्कमी गर्दी असल्याने  या ट्रेकला मजा येते. पाऊसाची चाहूल लागताच सगळ्या  "भटक्यांची    पाऊले"  डोंगर घाटवाटा, गडवाटा यांकडे पळती होतात.यावर्षीही दमदार सुरुवात झाल्याबरोबर आम्ही संधी साधली व ट्रेक केला.पाऊस पडायला सुरुवात झाल्या झाल्या ट्रेक ठरायला सुरुवात झाली.सुरुवातीला जवळचे ट्रेक करायला सोयीचे होतात.मोठ्या संख्येने भटके सह्याद्रीत शिरतात.


पावसाळ्यात माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक जात असतात.पण ट्रेकर वन ट्री हिल, सनसेट, गारबेट पॉईट व पेब किल्ल्याहूनही माथेरानला पायवाटेने चढतात. माथेरान हा काय गड नव्हे ट्रेकरना पाय मोकळे करायला मुंबईच्या जवळचे  योग्य ठिकाण आहे.हा ट्रेक गडावरचा नसल्याने ह्या ट्रेक माहीती मिडियात मिळत नाही.
   पनवेल एसटी डेपोवर सगळे भटके जमवल्यावर ’दोधानी’ बस ने प्रवास करीत ’दोधानी’ गावात पोहचलो. गावात टपरीवर चहा घेऊन ट्रेकला सुरुवात केली.पावसाचे ढग माथेरानच्या रांगेत विसावले होते. पावसाची चाहुल लागली होती.आमच्यावर अभिषेक करुन आमचे स्वागत केले.  सह्याद्रीवर हिरवा शालू दिसू लागला होता.धबधबे वाहू लागले होते.शेतकरी सुखावला होता,त्याची शेतातील लगबग दिसत होती.                     हिरव्यागार भाताच्या तरव्यांच्या बाजूच्या बांधावरून रांगेने चाललो होतो.ह्या ट्रेक नवख्यांसाठी खुपच चांगला आहे. हिरवे गालीचे मन हिरवे व प्रसन्न करीत होते.काही नवखे भटके आमच्यात सामिल झाले होते.हा निसर्ग पाहून तेही हरकले. 

                        


    हिरव्या वनराईतून चढाईला उत्साह संचारला होता. मळलेली मोठी वाट व हिरवाई असल्याने चढाई जोशात होती. मजा,मस्ती,घमाल करीत निसर्गाला जपत कार्यक्रमण सुरु होते.मध्ये मोठा पाण्याचा प्रवाह पार करावा लागतो.पाणी    उंचावरून   येते   असल्याने पाण्य़ाला वेग असतो.घसरण्याची शक्यता असल्याने सावधागिरी बाळगावी लागते.  'मन उधाण वा-याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते 'या कवितेतील ऒळीप्रमाणे मनाची अवस्था झाली होती. 

  पावसाळी वातावरणाचा आंनद घेत येत होता.निसर्गाने  केलेली रंगाची उघळण पाहून येथून जाऊच नये असे वाटत राहते.                           चढाईत मध्ये एक मंदीर लागते.तेथे दर्शन  व  विश्रांती घेऊन पुन्हा पुढे निघालो.

                                              नवख्यांना सरावासाठी  येथे नेण्य़ास काहीच हरकत नाही.                                                          गावाचे विलोभनीय द्द्श्य 
                        कॉर्नेशन पॉईटहून खाली दिसणारे गाव स्वच्छ घुतल्यासारखे दिसत होते.                                    लांबवर पाहिले तर ' मलंग गड' व 'चंदेरी' दिसतो.समोर पेबचा किल्ला , बाजुला गाडेश्वर घरण , पश्चिमेला प्रबळगड आंणि कंलावतीण त्याच्या बाजुला मोरबे घरण असा नजारा या ठिकाणाहून पाहण्यास मिळते.                                                         उतरण्याची तयारी   हरण टोळ या सापाचा विराह कॅमे-यात टिपता आला. झाडाझुडपात ह्या सापाचे दर्शन होणे हा दुर्मिळ क्षण असतो.

                                                                         सुंदर नवीन पाने
                                                    एका मनमोहक वनस्पती

   डोंगररांगांनी अंगावर पांघरलेला हिरवा शालू, भुरळ पाडणारं धुकं आणि खळखळत वाहणारे धबधबे. माथेरान येथील शॉवर्लेट या तलावा भरल्यानंतर पाणी खाली पाहटे तेव्हा त्याचे रुंपातर एक मोठ्या धबधब्यात होते. पॉईटहून या धबधब्याचे पाहता येते.


                                                    शेतक-याची शेतीतील लगबग या मोसमाचा पहिला ट्रेक चांगला पार पडला पण पण पावसाने साथ दिली आणखी आंनद लुटता आला असता.

No comments:

Post a Comment