Saturday, July 11, 2015

माथेरान - दोधानी ट्रेक                                           येथे क्लिक करावे ==>>  माथेरान - दोधानी ट्रेक


             माथेरान व्हाया दोधानी (पनवेल) ट्रेक
         ==========================      दरवर्षी पावसाळ्यात आम्ही  हा ट्रेक करतो. जाण्य़ास येण्यास
सोयीचा   व कमी गर्दी असल्याने  या ट्रेकला मजा येते. पाऊसाची 
चाहूल    लागताच  सगळ्या  "भटक्यांची पाऊले"  डोंगर  घाटवाटा, 
गडवाटा    यांकडे    पळती      होतात.यावर्षीही   दमदार  सुरुवात 
झाल्याबरोबर आम्ही संधी साधली   व ट्रेक केला. पाऊस पडायला 
सुरुवात झाल्या झाल्या ट्रेक ठरवायला सुरुवात झाली.सुरुवातीला 
जवळचे ट्रेक   करायला    सोयीचे   होतात.मोठ्या संख्येने भटके 
सह्याद्रीत शिरतात.

     ट्रेक म्हणजे फक्त गड किल्ल्यांची केलेली भटकंती नव्हे. तर 
डोंगरदर्‍यांवर    केलेले प्रेमही असते.मग त्यात घाटरस्तेही आले.
डोंगरवस्तीतील     जंगल        आले. ट्रेकींगच्या      नावाखाली 
गडकिल्ल्यांच्या साक्षीने    निसर्गसृष्टीत  मुक्तविहार करण्यास 
बाहेर    पडणारे     असे हे ट्रेकर्स म्हणजे  निसर्गाचे वेड लागलेले 
भटकेच. 


     पावसाळ्यात माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक जात 
असतात.   पण ट्रेकर वन ट्री हिल, सनसेट, गारबेट पॉईट व पेब 
किल्ल्याहूनही माथेरानला पायवाटेने चढतात. माथेरान हा काय 
गड नव्हे   पण ट्रेकरना पाय मोकळे करायला मुंबईच्या जवळचे 
योग्य ठिकाण आहे.हा ट्रेक गडावरचा नसल्याने ह्या ट्रेक माहीती 
मिडियात मिळत नाही.        पनवेल एसटी   डेपोवर  सगळे भटके जमवल्यावर ’दोधानी’ 
बस ने प्रवास   करीत ’दोधानी’ गावात पोहचलो.  गावात टपरीवर 
चहा घेऊन ट्रेकला सुरुवात केली.पावसाचे ढग माथेरानच्या रांगेत 
विसावले होते. पावसाची    चाहुल    लागली होती.   आमच्यावर 
अभिषेक करुन  आमचे    स्वागत केले.  सह्याद्रीवर हिरवा शालू 
दिसू    लागला होता.धबधबे  वाहू लागले होते.शेतकरी सुखावला 
होता,त्याची शेतातील लगबग दिसत होती.


     वाटेची   सुरवात    जर   गावाकडच्या शेतमळ्यांमधून होणारी 
असेल तर अधिक सुखावह ठरते.हिरव्यागार भाताच्या तरव्यांच्या
बाजूच्या बांधावरून रांगेने    चाललो  होतो.ह्या ट्रेक नवख्यांसाठी 
खुपच चांगला आहे. हिरवे गालीचे मन हिरवे व प्रसन्न करीत होते.
काही नवखे भटके आमच्यात सामिल झाले होते.हा निसर्ग पाहून 
तेही हरकले. 
     हिरव्या वनराईतून चढाईला उत्साह संचारला होता. मळलेली 
मोठी वाट व हिरवाई असल्याने चढाई जोशात होती. मजा,मस्ती,
घमाल   करीत निसर्गाला जपत कार्यक्रमण सुरु होते.मध्ये मोठा 
पाण्याचा    प्रवाह     पार करावा लागतो.पाणी    उंचावरून   येते   
असल्याने पाण्य़ाला वेग असतो.घसरण्याची शक्यता असल्याने 
सावधागिरी बाळगावी लागते.'मन उधाण वा-याचे गुज पावसाचे 
का होते बेभान कसे गहिवरते 'या कवितेतील ऒळीप्रमाणे मनाची 
अवस्था  झाली   होती.   पावसाळी वातावरणाचा आंनद घेत येत 
होता.निसर्गाने केलेली  रंगाची उघळण पाहून येथून जाऊच नये 
असे वाटत राहते. 


    एकंदरीत काय ट्रेकमय जिंदगी न्यारीच. नेहमीच्या लाईफपेक्षा 
हटके. केवळ    ट्रेकची आवड या  निकषावर मित्रांशी ओळख होते. 
नकळत  मैत्रीचे नाते गुंफले जाते.बस्स  येइल त्या परिस्थितीतून 
मार्ग     काढत पुढे कूच     करायचे   हेच  ट्रेकरला माहीत असते. 
साहाजिकच आपल्यातील मानसिक बळ आणि जिद्द या गुणांची
 येथे पारखण करता येते.

      चढाईत मध्ये एक मंदीर लागते.तेथे दर्शन व विश्रांती घेऊन 
पुन्हा पुढे निघालो.नवख्यांना  सरावासाठी  येथे नेण्य़ास काहीच 
हरकत    नाही.नवख्यांना   काही टीप्स  देत वाट्चाल सुरु होती.
पाउस नसल्याने  गरम झाले होते. मध्येच गार वारा आल्यावर 
सुखद गारवा हवाह्वासा वाटत होता.

      पाहता पाहता आम्ही सनसेट पॉईटवर  कधी पोहचलो तेच 
कळले    नाही.चढाई  संपली होती.पॉईटवर  काही पर्यटक होते 
त्याना    आम्ही खालून  वरीत चढत आलो ते  पाहून आच्शर्य 
वाटले.थोडीशी विश्रांती घेऊन थकवा घालवला व तसेच दुस-या 
पॉईटकडे     निधालो.  कॉर्नेशन पॉईटहून खाली दिसणारे गाव 
स्वच्छ घुतल्यासारखे दिसत होते. 
     डोंगररांगांनी अंगावर पांघरलेला हिरवा शालू, भुरळ पाडणारं 
धुकं आणि खळखळत वाहणारे धबधबे. माथेरान येथील शॉवर्लेट 
या  तलावा भरल्यानंतर  पाणी खाली पडते तेव्हा त्याचे रुंपातर 
एक  मोठ्या  धबधब्यात होते. ’लुईजा’ या पॉईटहून या धबधबा 
पाहता येतो.
  
 समोर पेबचा किल्ला,बाजुला गाडेश्वर घरण,पश्चिमेला प्रबळगड 
आंणि कंलावतीण   त्याच्या बाजुला मोरबे घरण असा नजारा या 
ठिकाणाहून  पाहण्यास मिळते.लांबवर पाहिले तर ' मलंग गड' व
'चंदेरी' दिसतो.


     ’लुईजा’ पॉईटहून फोटो सेशन करुन परत आल्या मार्गाने परत 
फिरलो.सनसेट पॉईटवर आडोसा पाहून आणलेले डब्बे उधडले.येथे 
माकडं त्रास देतात.  म्हणुन आमचा जेवणाचा कार्यक्रम आटोपला.
गप्पागोष्टी   व  गाणी झाल्यावर खाली उतरण्यास सुरुवात केली.

     खाली    गावात    पोहचताना  पुन्हा पावसाने शिडकावा करीत 
आमचा  निरोप घेतला.एसटी ने पनवेल आलो.सगळ्या भटक्यानी 
पुढच्या ट्रेकची आखणी करीत आपापल्या घरचे रस्ते घरले.  

     या मोसमाचा पहिला ट्रेक चांगला पार पडला पण पावसाने साथ 
दिली असती तर आणखी आंनद लुटता आला असता.


No comments:

Post a Comment