Wednesday, July 25, 2012

मलंग गडाचे गडकरी.काही महीन्याच्या गँपने आमची मित्रमडंळीनी मलंग गडाचा ट्रेक ठरवला. फोनाफोनी करुन भेटण्याची वेळ व ठीकाण ठरविले व पायथ्याशी सर्व जण जमलो. पायर्यानी चढताना कंटाळा येते होता. घाण व अस्वच्छा आणि रस्त्याला खुपच भिकारी आहेत. दर्ग्यापर्यतचे अतंर आम्ही पटापट चढत गेलो. दर्ग्याच्या परीसरात खुप गडबड व आरडाओरड होती. आमचे मुख्य लक्ष गडावर जाण्याचा असल्यामुळे आम्ही तेथुन पटकन बाहेर पडलो व गड चढण्यास सुरुवात केली.चढ चढुन गेल्यावर दगडातल्या उभ्या पायर्या चढाव्या लागतात. या पायर्या तुटलेल्या स्थितीत आहेत. त्या ठिकाणीच माकडे आपल्यावर चढाई करतात.त्याना भिती दाखविली तरी त्याना फरक पडत नाही. सरळ आपल्या अंगावर येतात व आपल्याला धाबरवुन आपली तलाशी घेतात.खीसे तपासुन खिशातुन वस्तु बाहेर काढतात.त्याना खिशात खाण्याच्या वस्तु मिळाल्यास काढुन घेतात व न मिळाल्यास चिडतात. चार पाच माकडे एकदम आपल्यावर चाल करुन येतात. सुटका करण्यासाठी त्याना काही खाण्याच्या वस्तु टाकाव्या लागतात. खाउपिउन चागली माजलेली ही माकडे सर्वाना त्रास देतात.माकडे काही मुलांच्या अंगावर आल्यामुळे त्याचा तोल जाण्याची भीती वाटत होती.

ती माणसाना भित नव्हती. खाऊ खायला घातल्यामुळे ती त्याच परीसरात फिरत असतात.हि माकडे जसे काही गडाला भेट दिल्याचा करच वसुल करतात. माझ्या काही मित्राना त्या ठिकाणी खुपच त्रास झाल्यामुळे व गडावर आणखी त्रास होईल म्हणुन वर चढलेच नाहीत. आमच्यातल्या काहीजणानी माकडांच्या तावडीतुन सुटका करुन पटकन पुढे चढुन गेले. तो ब्रुरुज चढल्यावर समोर गडाच्या पलिकडचा नजारा दिसतो. गडावर सगळ्या दिशेला फिरलो.फोटो काढले.मग हातात रस्सी व पायाखाली पाईप यावर तोल साभांळत दरीच्या एका टोक़ावरुन दुसर्या टोकावर जावे लागेल. तेथुन पुढे साखळीच्या मदतीने वर चढत राहुन गडावर पोहचलो. तेथुन समोरचे खुपसे गड पाहायला मिळ्तात. गडावर पाण्याच्या टाक्या व पडक़ी वास्तु आहे. खाली उतरताना तोल साभांळत उतरावे लागले. खोल दरी नजरे समोर दिसताना प्रत्येक पाऊल साभंळुन खाली उतरलो. परतीच्या मार्गावर माक़डे पुन्हा आमच्या स्वागताला होतीच. आमच्यातल्याने काट्याच्या साहाय्याने त्याना घाक दाखवुन पटकन खाली उतरलो.


ही माकडेच गडाचे खरे गडकरी आहेत.

No comments:

Post a Comment