Friday, July 27, 2012

गडप्रेमीनी गडांचे सौदर्य झाकाळु नये.कुटुबांतील छोट्या मोठ्या सह कर्नाळा या गडावर जाण्याचा योग आला. तसे या अगोदर दोन/तीनवेळा या अभयारण्यात व गडावर फिरुन आलेलो आहे.पाऊस नव्हता व गड चढण्यास उशिरा सुरु केल्याने सुरुवातीला मोठी मडंळी दमली.अभयारण्य हिरवाईने नटलेले आहे.मघ्ये मघ्ये मोर साद घालीत होता.प्रसन्न वाटत होते.


काही मडंळी पहिल्यांदा ट्रेकला आल्याने चढण्यास उशिर होत होते.पाणी पित धापा टाकीत पहीला टप्पा चढले.खालील परीसर वरुन पाहील्यावर मडंळी खुष झाली.मग हुरुप आल्याने पुढचा ट्रेक पटापट चढत चढत गेलो.


दरवाज्याने आत शिरलो तेव्हा सर्वाना आनंद झाला.समोरच अगांवर येणारा सुळका दिसतो.काळ्या कातळाचा सुळका कपारी कपारीचा दिसतो.खालुन दिसणारा आगंठ्याच्या आकाराचा सुळका जवळुन पाहण्यास आनंद वाटला.सुळक्यावर मघ्ये मघ्ये डाग दिसले. नीट पाहील्या नतंर कळले हायर्क्स नी त्या सुळक़्यांच्या दगडांवर त्यानी त्याची नांवे सफेद रगांत लिहीलेली दिसली. सुळक़्याचे सौदर्य या क्रुत्तीने झाकळलेले दिसले. निसर्गाचे सौदर्य आपण नेहमीच खराब करीत असतो. पयर्टक प्रेक्षणीय स्थळाना भेट देतात व त्या ठीकाणी आपली नांवे कोरतात.ह्या कृत्ती गुन्हयास प्रात्र आहे. तरीही हे पयर्टक स्थळांची शोभा खराब करतात.


या सुळक्या सारख्या ठिकाणी सामान्य माणुस चढु शकत नाही.तेथे फक्त जाणकार ट्रेकर साधन सामुग्रीच्या मदतीने चढु शकतात.मग हे साहसवीर आपण केलेल्या यशस्वी चढाई ची नोंद या ठिकाणी का करतात?गडप्रेमीनी या ट्रेकरना अशा गोष्टीपासुन दुर राहण्याची विनंती करावी. ट्रेकरनीही या गोष्टी न करता इतर ट्रेकरनादेखील यापासुन लांब ठेवावे. ट्रेकरनी असे केल्यास काही दिवसानी प्रेक्षणिय स्थळे,गड किल्ले पाहण्यास कोण जाईल का?

No comments:

Post a Comment