Sunday, July 29, 2012

पनवेल(धोधानी') ते माथेरान     पावसाळा सुरु झाल्यानतंरचा पहिलाच ट्रेक काल मित्रमडंळी व मुलाच्या मित्रासह केला.ट्रेक ठरविल्यापासून मित्रानी पटापट ट्रेकाला येण्याचे सांगितले पण शनिवारच्या पावसामुळे खुपसे मित्र गळाले.पनवेल येथे जमण्यास उशीर झाल्याने आम्ही 'धोधानी'ला जाणारी पहिली एसटी पक़डु शकलो नाही.एक तास एसटी स्टन्डवर गप्पा  करीत पट्कन निघाला.पाऊस जोरात पडत होता.पुढ्ची एसटी पकड्ली.एसटीत आम्ही सतरा जण होतो. निसर्ग पाहत आमचा प्रवास छान झाला.धोधानी येथे उतरल्यावर न थांबता ट्रेक सुरुवात केली. गावांतून पुढे एका छोट्याशा पठारावर आल्यावर माझा सहकारी 'श्रीयुत एकनाथ मराठे' याचा वाढदिवस आम्ही साजरा केला.छोटासा शि-याचा केक घरुन बनवून आणला होता.त्याने आमच्या आग्रहाला मान देऊन तो केक कापला व सर्वाना वाटला. माझ्या मुलाच्या मित्राना ही घट्ना वेगळीच वाटली व ते खुष झाले.मराठेला आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करणार याची कल्पना नव्ह्ती.पण आम्ही ट्रेकला त्याचा वाढदिवस साजरा केल्याने ट्रेक तो खुषीत होता. गप्पा करीत, मागील ट्रेकच्या मजा सांगत व निसर्ग पाहत आमचा ट्रेक होता.पाऊस झुरुमुरु पड्त होता.चढताना चागंला घाम निघत होता. पाऊस कमी झाल्याने गरम होत होते.ढग चागंलेच खाली उतरले होते.                                                                                                                                                                                                                   


सह्याद्रीच्या पर्वतावरून धबधबे खाली उतरताना दिसत होते.काय त्या निर्सगाची किमया.पाहण्यास असे ट्रेक करावे लागतात.आम्ही आता चागंलेच वर चढलो होतो.ढग बाजुला सरकल्यानतंर जो नजरा दिसायची त्याचे वर्णन करणे मला शक्य नाही.सगळे जण फोटो काढण्यात गुतंले     होते. शेवटचा चढ चढुन आम्ही सनसेट पाँईंटला पोहचलो.तेथुन खालचा परीसर व बाजुच्या पर्वत रांगा पाह्ण्यास आनंद झाला व तेथुन न हटता निसर्ग पाहत राहवासा वाटत होते.छोटीशी विश्रांती घेऊन 'माथेरान'च्या दिशेने वाटचाल सुरु केली.हवेत चागंला गारवा होता.ढगाची लपाछपी सुरु होती.त्यामुळे समोरचा नजारा पहताना मन भरत होते. एका पाँईटवर बसून आम्ही आणलेले खाणे खाल्ले.शाही भोजन झाले. इड्ली चटणी,  ठेपले,कांदेपोहे,  घावणे,अप्पे,  गुलाबजाम,  पुरणपोळी,  भाजी चपाती,  मसाले भात,अंडापोळी,ब्रेड बटर आणि केळी असा खाण्याचा मेनु होता. खाल्यानतंर पुढे लुईझा पाँईंट्वर फिरलो.खुपशी फोटोग्राफ़ी केली. वातावरण आल्हादायक होते. पुढचा परतण्याचा होता.पण आता पावसाना विश्रांती घेतल्याने उन पडले होते व गरम होण्यास सुरुवात झाली.काळजी घेत सावकाश खाली उतरत होतो. उतार उतरत एका धबधब्यावर पोहकलो.जागा निसरडी होती.सुरक्षित जागेवर सगळ्याना जमवून धबधब्याखाली मजा ट्रेकचा  क्षीण घालवला.हा आनंद वेगळाच असतो. मुलाच्या मित्रानी चांगलीच मजा केली. असा हा आमचा पहीला ट्रेक पावसाने मजेशीर झाला.पुढेच्या ट्रेक आम्हाला बोलावा अशी विनंती करीत सर्वानी एकामेकांचा निरोप घेतला
.

No comments:

Post a Comment