Tuesday, October 23, 2012

अवचितगड


दुर्गमित्र संस्थेचे मावळयांनी दीडशे फूट खोल दरीत अडकलेली तब्बल दोन टनांची शिवकालीन तोफ अवचितगडावर  चढवायल्या बातमी वाचल्यानतंर आम्ही अवचितगडावर रपेट मारण्यास निधालो. 
कोकण रेल्वेने रोहा स्टेशन गाठले.गाडीत चहापाणी झाल्याने आम्ही तेथे  न थांबता पिंगळसई गावाकडे चालण्यास सुरुवात केली.मस्त हिरवीगार शेतातच्या बाजुने जाणा-या डांबरी रस्तावरुन चालत चालत गाव गाठले.रोह्याहुन पूर्वेला 'पिगंळसई' गावापर्यत जाण्यास वीस पंचवीस मिनिटे लागतात.
 


कोकणात  कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून ५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे. 

 
 
घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.



 



गडाचे  प्रवेशद्वार, बालेकिल्ल्याच्या कमानी या काळ्या पाषाणातील असून सुबक व मापात दगड तासून, भार देऊन एकमेकांवर बसवलेले आहेत. बांधकामात फार थोड्या ठिकाणी, विशेषत: उत्तर बुरुजाच्या बांधणीत चुनखडीचा वापर सांधे भरण्यासाठी केलेला आहे. गडावरील तटबंदी, पाण्याची टाकी, मंदिर, वाडे हे सर्व बांधकाम ज्या पाषाणात केले आहे 





तो गडावरचाच आहे. गडावरील सात टाकी समूह व द्वादशकोनी तलाव यांच्या खोदाईमधून निघालेले चिरे बांधकामासाठी वापरले गेले आहेत. उत्तर बुरूज, दक्षिण बुरूज, बालेकिल्ला व प्रवेशद्वार यांच्या कमानी द्वादशकोनी, तलाव-वाड्यांचे चौथरे यांच्यासाठी वापरले गेलेले चिरे हे सुबक आकारातले व सफाईदारपणे तासलेले आहेत. 





इतर तटबंदीसाठी मात्र चिरे विशेष तासकाम न करता वापरले गेले आहेत. तटबंदीच्या चिर्‍यांमधील सांधे भरण्यासाठी बारीक बारीक दगडी कपच्या वापरलेल्या आहेत. एकूण गडाची बांधकामशैली ही गरजेपुरते काम या तत्त्वाची आहे. कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च करून उभारणी झालेला किल्ला याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवचितगड.






    अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वृषभ शिल्प आहे. शिलाहारांचे ते प्रतीक म्हणजे साधारण त्या काळापासून गडावर वहिवाट असल्याचा तो पुरावा मानतात.पेशवेकाळात घोसाळा ते पाली-सुधागडपर्यंतच्या महसूल-वसुलीचे काम अवचितगडावर होत असे.







गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : "श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा." 







दुसर्‍या दरवाज्यात पाण्याने भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. 
जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे.

 वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरुज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. 









आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.


 

गडावरील वास्तू-   
 कलावंतिणीची विहीर ,. मधला मोर्चा ,. प्रवेशद्वार, वृषभशिल्प , वाड्यांचे चौथरे , बालेकिल्ला ,

द्वादशकोनी तलाव ,. शिवमंदिरसातटाकी समूह, बाजी पासलकराचे स्थान, दक्षिण बुरुज,

शिलालेखखंदकतोफा , टेहळणीचा बुरूज, .



अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा

कालच ही अभिमानास्पद बातमी वाचायला मिळाली. वाचतांना असे वाटत होते की प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच घडते आहे.पनवेलच्या दुर्गमित्र संस्थेचे मावळयांचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा.  खरोखरच असा विचार मनात आणून प्रत्यक्षात आणणे ही फार अभिमानास्पद कामगिरी आहे.



अवचितगडावरील तोफ उचलतानाची चित्रफीत युटयूबवर fort conservation the avachit gad या नावाने उपलब्ध आह़े.



No comments:

Post a Comment