Sunday, November 25, 2012

गिरिदुर्गांचे आठ प्रकार


तंजावर च्या सरस्वती महल ग्रंथालयात अपूर्ण अवस्थेत असणार्या आकाशभैरवकल्प पोथी मध्ये पटल क्रमांक २१ ते २७ मध्ये अष्टविध गिरी दुर्गांची माहिती दिली आहे. डॉ.गोडे यांनी या ग्रंथा बाबत तपशीलवार माहिती प्रसिध्द केलि आहे. सुई सारख्या निमुलत्या आकाराचा, माणसाच्या आकाराचा,सुपाच्या आकाराचा,मध्ये तुटलेला,वाकडा तिकड़ा,नांगरा सारखा असे किल्ले राजाला राहण्यास योग्य नाहित. याच ग्रंथात भद्र,अतिभाद्र,चन्द्र,अर्ध-चन्द्र,नाभ,सुनाभ,रुचिर,वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे आठ उप प्रकार सांगितले आहेत.

) भद्र गिरिदुर्ग: म्हणजे जो वर्तुळाकृति स्निग्ध आणि पर्वताच्या उंच पण सपाट पठारी शिखरावर आहे.तेथे पानिहि भरपूर आहे.आशा ठिकाणी राजा हत्तीवर बसून ध्वज पताका घेउन वर जाऊ शकतो.

)अतिभद्र गिरिदुर्ग म्हणजे ज्या डोंगराचे टोक खुप ऊंच चौकोनी,विस्तीर्ण व् जल समृद्ध आहे अशा डोंगर शिखरावर बांधलेला किल्ला.

) चन्द्र गिरिदुर्ग म्हणजे पायथ्या पासून वर चढ़न्याचा मार्ग अवघड आहे,ज्याचे शिखर मोठे पण चंद्राकृति असते जेथे भरपूर पाणी असते,असा डोंगरी किल्ला

) अर्ध चन्द्रगिरिदुर्गम्हणजे ज्याचा पायथा शिखर अर्धचंद्राकृति आहेत.जो मध्यम उंचीचा पण उत्तम पाण्याचा भरपूर साठा आहे,असा डोंगरी किल्ला.

)नाभ गिरिदुर्ग म्हणजे कमळाच्या फुलासारखा विकसित झालेला ज्याचा आकार आहे.

)सुनाभ गिरिदुर्ग हा पायथ्याशी पुरेसा रुंद व् वर क्रमाक्रमाने निमुलता होत गेलेला डोंगरी किल्ला

)रुचिर गिरिदुर्ग पायथ्यपासून वरपर्यंत लहान मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.

)वर्धमान गिरिदुर्गाच वैशिष्ट म्हणजे तो अर्दालाकार डोंगरावर वसविला आहे.

आज मितिस अशा सर्व प्रकारचे किल्ले अचुकपणे दाखविता येत नाहित.

No comments:

Post a Comment