Wednesday, December 5, 2012

भूपतगड

     जव्हार ला गेल्यावर ' भुपतगडावर ' जाण्य़ाचा योग आला. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ,एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे.त्याचे नाव भूपतगड.

मुंबई जवळ असूनही या दुर्गम भागात सहज जावू याचा विचारही कुणी करू नये असा हा भूपत गड.रस्ता चांगला नाही.जव्हार येथून एसटी या गावात जाते. 


 

                                                       रामसीता व लवकुश यांच्या पाउलखुणा   
गडावर ज़ाण्याचा रस्ता :जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.


     भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत.
 
 प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. 
वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे.


संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.
 
      हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,


 

भूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.


गडावर जाण्य़ासाठी संपर्क श्री.संदिप कुरबुडे ८६९८६९७३६३ (गडाच्या पायथ्याचे गाव)

No comments:

Post a Comment