Sunday, March 31, 2013

भिमाशंकराचे दर्शन




भिमाशंकर मंदिर भिमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील बारा लिंगा पैकी सहावे ज्योतिलिंग भिमाशंकर आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा. 




  

भीमाशंकर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक नयनरम्य ठिकाण, इथे उन्हाळा सोडून कोणत्याही रुतुत येऊ शकता.परिसर अतिशय रम्य आहे.







भगवान शंकराचं मुख्य स्थान हिमालयातील कैलास जरी असलं तरी पश्चिम घाटाच्या डोंगररांगाही त्याला प्रिय आहेत. सह्यादीतल्या अशा कितीतरी सुरम्य...






 

दाट रानांनी वेढलेल्या ठिकाणी त्याच्या वास्तव्याच्या जागा आहेत. या दुर्गम जागांच्या भोवती परंपरेने अनेक कथा गुंफलेल्या आहेत.








अशीच एक पौराणिक कथा... एका अरण्यात भीमक नावाचा राजा उग्र तप करत होता. त्याच्या तपावर श्रीशंकर प्रसन्न झाले व त्यांनी राजाला दर्शन दिलं. त्या वेळी शिवाच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. राजाने त्या धारांची नदी होऊ दे. अशी शिवाजवळ प्रार्थना केली. शिवाने ' तथास्तु ' म्हटलं... आणि भीमेचा उगम झाला. स्थळाला नाव पडलं... भिमाशंकर.






इथल्या संपन्न निसर्ग... घनदाट जंगल... भरपूर कोसळणारा पर्जन्य... मेघांनी वेढलेला आसमंत... साहजिकच परिसर मंतरलेला. मनातली देवाची कल्पना वृद्धिंगत करणारा... त्यातच शंकराचं बारा ज्योतिलिंगापैकी एक देऊळ... यामुळे मराठी श्रद्धाळू मनाचा ओढा इथे पूवीर्पासून आहे.








कोकणातून भिमाशंकरला पायी जाण्याचा मुख्य मार्ग खांडसहून आहे. कर्जत खांडस अंतर सुमारे 14 किमी आहे. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कशेळे आहे. इथून खांडसला जायचा वळण आहे. खांडसहून भिमाशंकरचा ट्रेक साधारण अकरा किमीचा खड्या चढणीचा आहे. इथूनदेखील वर जाणारे दोन मार्ग आहेत. दोन्ही वाटा डोंगराच्या पहिल्या पठारावर मिळतात. एक मार्ग ' गणपतीघाट ' या नावाने ओळखला जातो. हा रस्ता थोडा वळण घेऊन जाणारा असला तरी अतिशय निधोर्क आहे.






दुसरा मार्ग शिडीचा रस्ता म्हणून डोंगरभटक्यांना परिचित आहे. या मार्गातली तीन-चार ठिकाणे अतिधोकादायक आहेत. इथे दोन ठिकाणी कपरीत शिड्या लावलेल्या आहेत. पहिल्या पठारावर जाणारा हा मार्ग एका उभ्या कड्याच्या कपारींमध्ये काढलेल्या असल्याने पावसाळ्यात पूर्णपणे निसरडा होतो व बहुतेक टप्पे दरीच्या बाजूने असल्याने धोकादायक आहेत. असं जरी असलं तरी नेहमीच्या सराईत भटक्यांना या साहसी मार्गाने जाण्याची ओढ असते. तरुणांच्या सहज प्रवृत्तीप्रमाणे त्यांना थरार अनुभवायला आवडतोच. पण जरा जपूनच गेलं पाहिजे.अनेक वाटांवर भरकटण्याची शक्यता दाट आहे.तसेच दाट धुके असल्याने खांडसहून स्थानिक माणूस घेणं अत्यावश्यक आहे.








दगडी कोरीवकाम केलेले सुंदर मंदिर आहे मंदिर हेमाडपंथी बांधनीचे आहे.







मंदिर थोडं खालच्या बाजूला असल्याने पाच मिनिटं दगडी पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिराची बांधणी साधी असून गाभारा मोठा आहे. मंदिरासमोर भल्यामोठ्या दगडी खांबांना लटकवलेली प्रचंड घंटा आहे.







भिमाशंकरच्या पुरातन देवळाच्या दर्शनी बाजूला गणेशाची पुरातन सुंदर मूर्ती आहे.  









                                       भिमाशंकर परीसरात दिसणारी खार 'शेकरु'







भिमाशकंर ट्रेकची मजा काय वेगेळीच आहे.

1 comment:

  1. मस्त , ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या. मी पण हाच ट्रेक केला आत्ताच
    त्याचे अनुभव लिहिलेत माझ्या ब्लोग वर । जमल तर वाचून घ्या एकदा :)
    http://sagarshivade07.blogspot.in/2013/03/blog-post_26.html

    ReplyDelete