Monday, June 17, 2013

सह्यादीतले आजोबा



      दाटीवाटीनं वाढलेली प्रचंड आकाराची झाडं आणि रस्त्यावरून चालताना मध्येच दिसणारी मोठमोठी वारुळं... विविध पक्ष्यांचे आवाज तर कधी वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा अशी सारी निसर्गसंपदा घेऊन 'आजा पर्वत' उभा आहे.सह्याद्री रांगेतील उंच शिखरापैंकी एक शिखर.




      आजोबाला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणजे डोळखांब-साकुलीर्जवळच्या डेणे गावावरून जाणारा.खासगी प्रवासी जीपची वाहतूक या भागात असल्याने प्रवास सुखकर होतो




    आजाच्या खाली वाल्मिकी आश्रम आहे. रस्ता मोठा आहे बैलगाडी अगदी आश्रमापर्यंत जाते.  मनात आले चला बैलगाडीचा का असेना रस्ता तर आहे जरा जाऊन तर बघू .सगळा परिसर घनदाट जंगलाचा व असीम शांततेचा आहे. या गर्द झाडीत दोन वास्तू आहेत. एक आहे वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि दुसरी लहानशी धर्मशाळा. 

 



आश्रमाचा परिसर एकदम मोठा, शांत, स्वच्छ आणि पवित्र. आश्रम म्हणजे एक पुरातन काळातील दगडी बांधकाम असलेल कौलारू घरासारखे आहे. त्यात  वाल्मिकी ऋषीची समाधी आहे..समोर राम, सीता, लव आणि कुश यांची पदचिन्हे दगडात कोरलेली आहेत.  आश्रमासमोर भक्तांसाठी एक मोठा निवारा म्हणजे घर्मशाळा आहे. पावसाळा सोडून मात्र ही जागा मुक्कामाला एकदम सही आहे.

या ठिकाणी वाल्किमी ऋषींचे वास्तव्य होते. आश्रमाच्या मागे असलेल्या सूळक्यात एक गुहेसारखी मोठी जागा आहे त्या ठिकाणी सीता माईने लव-कुश यांना जन्म दिला असे सांगितले जाते. त्या जागेला सीतेचा पाळणा म्हणतात.
 




डेण्याहून वरती जाणारी पायवाट बहुतेक ठिकाणी चांगलीच रुंद असून अतिशय सोपी आहे. लांब लांब वळणांचा रस्ता असल्याने चढणही पार करणं,तेवढं दमछाक करणार नाही.आश्रमातील घ्रर्मशाळेत बसून पोटपुजा करुन थोड्या अतंरावर असलेल्या धबधब्यात जाउन मजा करता येते.ट्रेकमघ्ये धबधब्याची मजा घेता आली तर तो आणखी मजेशीर होतो.ट्रेकचा क्षीण लगेल जातो. 

 


१६ जुन  २०१३ रोजी  मुंबई व ठाणे जिल्हात भरपूर पाउस झाल्याने आम्हाला ही या ट्रेक मघ्ये पावसाने झोडपुन काढले.घरातून बाहेर पडल्या पासून घरी पोहचेपर्यत पावसाने आपली साथ सोडली नाही.आजोबाचा निर्सग पावसाने प्रफुलित दिसला.






 आजोबा आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला जे काही देईल,ते शब्दात नाही सांगता येणार.त्यासाठी प्रत्यक्ष जायलाचं हवं.

No comments:

Post a Comment