Monday, September 2, 2013

किल्ले कोरीगड उर्फ कोराईगड|



लोणावळा आणि पालीला जोडणा-या साव घाटाजवळ वसला आहे किल्ले कोरीगड!!













मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचे नावं आहे कोरबारस मावळ.याच मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले.








१६५७ मध्ये महाराजांनी कोराईगड लोहगड,विसापुर, तुंग-तिकोना या किल्ल्याबरोबर स्वराज्यात सामील करून घेतला, या व्यतिरीक्त इतिहासात याचा फारसा उल्लेख नाही.









कोराई देवीचे दागिने इंग्रजांनी मुंबईतील मुंबादेवीला दिल्याचाही उल्लेख इतिहासात आडळतो. या पलिकडे कोरीगडचा इतिहासात उल्लेख नाही.







गडावरच्या कोराईदेवीवरूनच याचे नाव कोराईगड पडले असावे.गडावर आजही सहा तोफा सुस्थित आढळतात. त्यातील सर्वात मोठ्या तोफेचे नाव "लक्ष्मी".






कोरीगड किल्ल्याचा माथा म्हणजे एक विस्तृत पठार. तुलना करायची म्हंटलं तर शिवाजी पार्कपेक्षा जरा मोठं.  मात्र  चौफेर तटबंदी.  प्रवेश केल्यावर उजवीकडून सुरुवात करायची. तटबंदी आणि बुरुज बघत चालत रहायचं.  इतक्या वर्षानंतरही टिकून राहिलेल्या या तटबंदीकडे बघुन आश्चर्यचकित व्हायला होतं.









कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.







                                                          गडाला चहूबाजुंनी तटबंदी आहे.







                                               दक्षिणेकडे बुरुजाची चिलखती तटबंदी आहे.












गडावर दोन मोठाली म्हणता येतील अशी तळी आहेत.. एक शिव मंदिर, एक हनुमान - गणेश मंदिर आणि मुख्य 'कोराई देवी' चे मंदिर.






गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कडयाच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.





No comments:

Post a Comment