Friday, October 4, 2013

सोनगिरी किल्ला (पळसदरी)



    










    छोटासा ट्रेक करण्याचा बेत आखला. मोहीमेची आखणी झाली. मुंबईपासून जवळ असल्याने पळसदरी येथील 'सोनगीरी या ट्रेक ला जाण्याचे ठरले.रविवारी कर्जत गाडीने निघालो.कर्जतहुन खोपोली लोकलने पळसदरी गाठले.समोरच ढगात लपलेले 'सोनगिरी' चे शिखर दिसत होते.































  रेल्वेचा कर्मचा-याने रेल्वेमार्गाने बोगद्यापर्यत जाण्याचा मार्ग दाखवला.त्याच्यासह गप्पा मारीत आम्ही बोगद्यापर्यत पोहचलो.बोगद्याच्या अगोदर डाव्या हाताला खाली उतरायचे व गवत बाजुला करीत वाटेला लागायचे. वाढलेले गवत व दाट रानातून वाट काढणे कठीण होते.वाट मिळेले तसे आम्ही पटापट चढत गेलो. पण एका ठीकाणी कातळावर पोहचलो तेथून पुढे वाट मिळत नव्हती.कातळाच्या बाजुनी माणसाच्या उंची पेक्षा मोठे गवत वाढलेले होते.चारी दिशेला आम्ही फिरलो पण वाट सापडत नव्हती.नतंर सगळीकडेच वाटा दिसायला लागल्या.आमचा खूप वेळ वाया गेला.































  थोडावेळ खाणेपिणे केले व नव्य दमाने सुरुवात केली.आमच्या सहका-याला वाट सापडली.एका कातळाच्या पँचवर चढाई करीत पुढे निधालो.











  
कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा. 















गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.














 
किल्ल्यावर तसे काहीच नाही. दोन टाके आहेत.बुरुजाची निशाणी आहेत.पण सभोवतलची दृश्ये  पाहण्यासारखी आहेत. रेल्वेगाडी हिरव्या वनराईतून व बोगद्यातून पळताना पाहण्य़ासारखी असते.










थोडे खाली उतरून पोटपूजा केली. गप्पा-गोष्टी आणि मजा करत सगळ्यांनी उतरायला सुरुवात केली. साधारण दोन-एक तासांत आम्ही पुन्हा पळसदरी स्टेशनला पोहोचलो. 

























सुमारे तासभर तरी अंतर चालल्यानंतर आम्ही कर्जत स्टेशनला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर गरम गरम मसाला चहा आणि कांदा भजी खात छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या विशेष लोकलने परतीचा प्रवास सुरू झाला.









3 comments: