Friday, November 29, 2013

तोरणा ते राजगड ( तोरणा किल्ला ) - भाग १



पावसाळा संपला,दिवाळी संपली आता हिवाळा सुरु होत असल्याने तोरणा ते राजगड या ट्रेकचे  आयोजन केले.मित्रमंडळी जमली दोन दिवसात करण्याचे ठरले.  गुरुवारी मुंबईहून निधून पुण्यात शुक्रवारी पहाटे पोहोचलो. स्वारगेटहून   'वेल्हे'   या   एसटीने  प्रवास   करीत  'वेल्हे ' गावात पोहोचलो.तेथून चहापाणी करून      ' शिवाजी महाराज कि जय  ' या धोषणा देत मोहीमेला सुरुवात केली.  थंड वातावरणा मावळे जोशात चढाई करीत होते.समोर आव्हान उभे आहे.इतिहासाची उजळणी करीत गप्पा गोष्टी
चालल्या होत्या.

तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.

कानदखोऱ्यात हा गड आहे. खूप उंच उंच उंच. तोरण्याइतका उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यांत त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रुंदही आहे. गाडला दोन माच्या आहेत 





        छत्रपती शिवरायांनी सुरुवातीच्या कालखंडात जिंकलेल्या किल्ल्यापैकी तोरणा किल्ला आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे 

तोरण उभारले होते.












     छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला हा किल्ला पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड' असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्‍यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत 





                                                                बिनीव्दार  

बाजुचा परिसर पाहण्यात गुंतलो.थोडी विश्रांती घेतल्यानतंर उभी चढाई करीत 'बिनी दरवाजा' शिरलो.






                                                                कोठीव्दार      

       बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण थेट बालेकिल्ल्यातच शिरतो. 


 हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.1470 ते 1486 च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5 हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करू न आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.





                                                                     झुंजार माची


झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला .


हनुमान बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते.













तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्‍या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम.

झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर. झुंजार माचीचा बांधकाम नावाप्रमाणेच शोभून दिसतं. या रस्त्यावर सदरेचे उद्वस्त अवशेष आहेत.


झुंजार माचीवरून गडाचा गड राजगड रुबाबदार पणे उभा दिसला, अस वाटत होत की तो पण आम्हाला बोलवत आहे. 














                                                तोरणा वरचा सुर्यास्त 
                                                              बाजुला बुधला माची











                                                            मेंगाई देवीचे मंदीर

















बुधला माचीच्या मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे व त्या वर एक प्रचंड आकाराचा दगड अनेक शतकांपासून आजही आहे. त्यामुळे तो लांबून एखादया तेलाच्या बुधल्या सारखा म्हणजे रांजणासारखा दिसतो. म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.











                                                                      बुधला माची


बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता... या माचीकडे जाणार्‍या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.














हा तोरणा अत्यंत बळकट, बिकट गड आहे. काळेकभिन्न, ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे,  काळ्या सापासारखी वळणे घेत सळसळत जाणारी तटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे रांगडे सौंदर्य शिवरायांच्या नजरेत भरले.










                                                                 कोकण दरवाजा
















                               बुधला माचीला मागे ठेवून खाली उतरण्यास लागलो.







                                                           तोरणा किल्ल्याचा नकाशा

No comments:

Post a Comment