Saturday, December 7, 2013

तोरणा ते राजगड - भाग २



पहाटेच्या सुर्योदयाचे दर्शन घेउन सँक पाठीवर चढवली.'मेंगाई देवी'चे आर्शिवाद घेऊन निघालो.





   तोरणाच्या या कड्यावरून नजरेत दिसतो 'तोरणा-राजगड' या ट्रेकचा मार्ग. बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.एक एक डोंगर पार करीत संजीवनी माचीपर्यत पोहचतो.






   बुधला माचीपर्यतची वाट प्रेक्षणीय आहे.डोंगराच्या सोंडेवर चालत चालत पुढे बुधला पाहत उतरत जातो.फोटोग्राफ्रीला चांगला वाव येथे आहे. सावधतेने मजा करीत करीत समोरचा परीसर न्याहाळत खाली उतरलो.





    समोर राजगड दिसत असल्याने कधी तेथे पोहचतो असे वाटते.वाट सरळ पुढे जात असते ती वाट पकडून
चालायला सुरुवात केली.मध्ये मध्ये कारवीची बेठे लागतात.त्यातून जाताना थंडगार वाटते. 







       'तोरणा' गडाला मागे ठेवीत 'राजगडा'च्या दिशेने वाटचाल सुरु होती. मध्ये थोडी विश्रांती घेतली.या मार्गात
फक्त एक घर मिळते.आम्ही तेथे सगळे जमलो.त्या घरातून ताक घेतले.निघणार इतक्यात आमच्यातल्या एका मित्राने त्याचा किंमती कँमेरा रस्त्यात पडला, अशी ओरड केली.आमच्या सगळ्यांच्या सँक तपासल्या. आमच्यातले दोघे आलेल्या वाटेने मागे कँमे-याच्या शोधात निघाले.खुप अंतर मागे गेले तरी त्याना कँमेरा सापडला नाही.मागे फिरल्यावर वाटेत दो  ट्रेकर भेटले ते त्याच वाटेने 'तोरणा' गडाकडे निघाले होते.माझ्या मित्रानी त्या दोघाना कँमे-याची माहिती दिली व मोबाईल नबंर दिले. कँमेरा मिळाल्यास कळविण्याची विंनती करुन ते मागे फिरले. ज्याचा कँमेरा हरवला तो निराश झाला होता.त्यानी 'कँमेरा विसरा व पुढची वाटचाल सुरु करा' अशी विंनती केली.त्याचा कँमेरा हरवल्याने मला खुप वाईट वाटले.











   आम्ही सगळे आता पुढे काय करायचे या विचारात होतो.आमच्यातल्या एकाने कँमे-याच्या शोधात मागे जाण्याची तयारी  दाखवली. त्याच्यासह दुसरा मित्रही तयार झाला.त्यावेळेला तो ट्रेक अर्धवट टाकून कँमे-याच्या शोधात निघणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. ज्याला ट्रेकला जाण्याची आवड आहे तोच मित्र मागे फिरण्यास तयार झालेला पाहून आम्हा सर्वाना खुप वाईट वाटले.फोटोग्रीफीची त्याला मोठी आवड असल्याने कँमेरा हरवल्याचे त्याला दु:ख झाले होते.या कारणामुळेच  तो मागे फिरत होता.आम्ही सर्व गोंधळलेले होतो.ज्याचा कँमेरा हरवला तो त्या दोघा मित्राना कँमे-याच्या शोधात मागे पाठविण्यास तयार नव्हता.'माझा कँमेरा विसरा आपण पुढे चला' असा त्याचा आग्रह होता. 'तोरणा' गडाचा उतारण्याचा पँच असल्याने ज्याचा कँमेरा हरवला होता तो मगे जाण्यास तयार नव्हता.









  शेवटी त्या दोघाना खाण्याचा वस्तू दिल्या.ते लगेच निरोप घेऊन निघाले आम्ही राजगडाच्या दिशेने निघालो. या गडबडीत आमचा दिड तास वाया गेला.उन्ह चढल्याने पुढची वाटचाल त्रासाची झाली.कडक उन्हात उभी चढ असल्याने दमछाक झाली.आमच्या टिममधले दोघेजण नसल्याने आम्ही हताश झालो होतो.सगळेजण शांततेत चालत होते.



    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




 समोर संजीवनी माची हाकेच्या अंतरावर दिसत होती.  संजीवनी माचीचा भव्य बुरुज खालून विलक्षण दिसत होता. व त्यावरील भगवा ध्वजामुळे त्याला वेगळाच साज चढला होता.









आता चढाईला वेग आला होता.आम्ही माचीवर पोहचलो.धोषणा दिल्या.तेथे ताक घेऊन लहान मुलीनी आमचे स्वागत केले. ताक पिऊन शांत झाल्यावर पुढे निघालो.माचीची तटबंदी पाहून थक्क झालो.बाजुचा परीसर पाहिल्यानंतर आमचा क्षीण नाहिसा झाला.समोर दुरवर 'तोरणा' गड दिसत होता.आम्ही केलेल्या  ट्रेकचे अंतर पाहून आमच्या पायावर आमचा विश्वास बसत नव्हता.






  आम्ही मचीवरून बालेकिल्ल्याकडे निघालो.इतक्यात माझा मोबाईल वाजला.मुंबईहून फोन होता.'आपला हरवलेला कँमेरा मिळाला' हे वाक्य ऐकल्यावर मी मोठ्याने 'कँमेरा मिळाला' अशी आरोळी ठोकली.सर्वजण ओरडत नाचू लागले. आनंदाला उधाण आले.ज्याचा कँमेरा हरवला होता त्याला सगळ्यानी शुभेच्छा दिल्या. तो तर आंनदाने व मित्राने घेतलेल्या परीश्रमाला आलेल्या यशामुळे रडू लागला होता. जे दो   ट्रेकर 'तोरणा गडा' कडे  गेले होते त्याना  रस्त्यात कँमेरा पडलेला मिळाला.त्यानी फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याठीकाणी
रेंज नसल्याने आमच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.आमच्या दोघा मित्रांनी त्या दोघाना 
'तोरणा गडा ' वर  भेटून ओळख सांगितल्यावर त्यानी   कँमेरा  दिला. ते दोघे सच्चे ट्रेकर होते.





मी माझ्या कँमे-यासाठी मागे जायाला पाहिजे होते.पण त्या कामासाठी माझे मित्र मागे गेले आणि त्यानी कँमेरा मिळविला होता.त्या दोघानी माझ्यासाठी त्रास घेतला होता.याची त्याला सारखी जाणीव होत होती.





दुस्र-याच्या आनंदासाठी आपला आंनद पणाला लावण्याची  धडाडी दाखवणा-या आमच्या मित्राना  माझा सलाम.  ही शोध मोहिम हाती घेणारे मित्र आमचे   हीरो  ठरले होते.

 आम्ही त्या दोघा मित्राना फोन करीत होतो.पण लागत नव्हता.त्यांच्याशी बोलण्यास आम्ही आतूर झालो होतो.पण ते दोघे तेथून सरळ तोरणा गडावर गेले व तेथूनच रात्री गड उतरून मुंबईला गेले.

    आम्ही संजीवनी माचीवरून आंनदात निघून बालेकिल्याच्या बाजूने 'पद्मवती माची'कडे निघालो.   राजगडावर आम्ही राहिलो.रात्री कँमफायरला कँमेरा मिळाल्याने वेगळीच मजा आली.

No comments:

Post a Comment