Saturday, March 15, 2014

किल्ले वासोटा -अनोखे दुर्गरत्न




 नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकणाऱ्यांवर वासोटा या शब्दाची विलक्षण मोहिनी आहे.






वासोटा किल्ला  ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.  वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.




 कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्‍य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे 'किल्ले वासोटा'..किल्ले पद-भ्रमण करणाऱ्या हौशी तरुणाचा हा आवडता किल्ला आहे.अत्यंत पुरातन ,निबिड अरण्याने वेढलेला असा हा दुर्गम दुर्ग आहे.








साता-याहून ‘कास’ नावाच्या पुष्प पठाराला मागे टाकून त्याच रस्त्याने पुढे गेलो असता दुरवर एक विस्तृत जलाशय पसरलेला दिसतो.. त्याच्याच दिशेने पुढे खाली उतरलो की बामणोळी हे सुंदर नि छोटेसे गाव लागते..
तेथून शिवसागर जलाशयातून बोटीने करावा लागणारा प्रवास हाच ट्रेकमधील उच्च आकर्षणबिंदू होता..









 ‘वासोटा’ ट्रेक करायचा असेल तर इथेच वनखात्याकडून रितसर परावनगी घ्यावी लागते




                                                        कोयना जलाशयाचे विलोभनीय दर्शन 





 बोट हळूहळू खर्‍या अर्थाने जलाशयाच्या पोटात घुसू लागली..प्रवाहाच्या दोन्ही बाजूला जंगल नि जंगल.. जिथे चाहूल कुणाचीच नाही.. आवाज फक्त बोटीतल्या मोटारीचा… नि पाणी कापताना होणार्‍या खळखळाटाचा.. ! बोट जितकी पुढे सरकत होती तितके पाणी स्तब्ध होत गेलेले..  मग त्या स्तब्ध पाण्यावर पडलेल्या काठालगतच्या झाडांच्या आकृत्या बघण्यात मन केव्हा गुरफुटून जाते ते कळतही नाही….




                                    बजरंगाचे छप्पर नसलेले देउळ आहे.. पण मुर्ती छान आहे.. 







शिवसागर जलाशयाचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते.बोटीतून उतरल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पुन्हा प्रत्येकाची नोंद घेतात.साहित्य तपासतात.विशेषत: प्लास्टिकच्या बाट्ल्या.नेलेल्या परत आणल्या नाहित तर दंड वसूल करतात. 









सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोचू देत नाही असे घनदाट जंगलातून गडचढाई सुरु होते. कोयनेच्या जंगलात झाडांच्या माहितीसोबतच वेगवेगळ्या वन्य पशूंची माहितीही त्यांच्या चित्रांसकट दिलीय. ही सर्व श्वापदं या जंगलात आहेत.या अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपन्न वृक्षवल्लींबरोबर वन्यजीवांमध्येही वैविध्य आहे. वाघ, बिबळ्या, गवा, अस्वलं, रानकुत्र्यांच्या कळपापासून धनेश, सोनपाठी सुतार, तुर्रेवाला कोतवाल, सर्प गरुड, समुद गरुड आदी कैक जाती-प्रजातींच्या पशुपक्षींचं वास्तव्य आहे. 





                                                गडावर एक महादेवाचे मंदिर आहे.




 माचीवरुन घनदाट जंगल, कासचं पठार, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, महिपतगड, महिमंडनगड, पालगड व सुमारगडाचं विहंगम दृश्य नजरेस पडते.  








 प्रसिद्ध बाबूकडयाचे दर्शन.  बाबूकडा नावाचा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची याद देणारा "यु" आकाराचा कडा आहे. वासोटा किल्ला पाहून जेवण केले व नागेश्वराच्या गुन्हेकडे प्रयाण केले.

No comments:

Post a Comment