Tuesday, April 1, 2014

थरारक गोरखगड..

गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव 'गोरखगड'. मोठा सुळका गोरखगड आणि छोटा मच्छिंद्रगड


गोरखगड आणि मच्छिद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे.


डावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा. पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते.


गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा 'मच्छिद्रगड' निसर्गाच्या भव्य अदाकारिचे असीम दर्शन घडवतो.समोर गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे. पण खालचा भाग खूपच ओबडधोबड आहे. तरी यात २० जण सहज मावतील. गुहेसमोर छोटासा अंगण असावा असा भाग आहे. पण तो भाग तसा खूपच छोटा आहे. इथून थोडा पुढे गेला की चांगल्या पाण्याची टाकी आहेत. खूपच अप्रतिम, गारेगार  आणि चविष्ट पाणी या टाक्यात असते. 


गडाचा माथा फारच लहान आहे.वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे.
माथ्यावरून समोर मच्छिद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो. रॉक पॅचवरून एकएक पाऊल, एकएक पायरी खाली उतरणं जास्त आव्हानात्मक आहे.

दुपारच्या उन्हात गडावरुन उतरताना हात भाजत होते.दगडावर हाताला चटके बसत होते.
मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवा-याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
गोरखगडाची किंवा एकूणच सह्याद्रीतल्या सगळ्याच किल्ल्यांची,डोंगररांगांची   वेगळीच मज्जा आहे.

             गोड आठवणी घेऊन गडावरून सावकाश उतरत  थरारक ट्रेक संपला.

No comments:

Post a Comment