Friday, April 4, 2014

नागेश्वरची गुहा




नागेश्वराच्या गुहेकडे आजचा मुक्काम करण्याचे ठरल्याने वेगळाच उत्साह होता.गुहेच्या समोर सह्याद्रीची रांग पसरलेली. समोरचा परीसर सुंद‍र.  






चढताना धारेवरून व पुरळ असलेल्या मातीच्या वाटेने प्रवास सुरु होतो. घसरण्याची शक्यता असल्याने 
सावधतेने या वाटेने गुहेकडे जाताना आपल्याला परीक्षा द्द्यावी लागते.











नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, पायर्‍य़ांच्या उजवीकडून जंगलात जाणारी वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते.













  नागेश्वराच्या सुळक्याच्या पोटात ही  गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. 











 गुहा गाठली.. बर्‍यापैंकी मोठी.. फरशी घालून कठडा बांधलेला.. तिथेच मध्यभागी महादेवाचे मंदीर.. वरतून कातळाच्या छतातून झिरपणार्‍या पाण्याचे नेमके पिंडीवर अभिषेक करणारे थेंब.. बाजूलाच त्रिशूळ.. नि समोरच असलेल्या नंदीच्या पाषाणातील तुटलेल्या अवस्थेतील दोन तीन मुर्त्या आहेत.












                                            गुहेतून पाहिलेला सुर्यास्त 







                                                         गुहेतून पाहिलेला सुर्योदय 


















                                                        गुहेकडून चोरवणे  जाण्य़ाची  तयारी 








                                 उभी उतरण असल्याने सावधानता बाळगावी लागते. 









                                            चोरवण्याच्या दिशेने दिसणारी नागेश्वराची गुहा.



 ट्रेकची  मजा घेत  आम्ही घरी फिरलो. पुढेची ट्रेकची आखणी करीत.

No comments:

Post a Comment