इर्शाळगड
प्रहार या ( २ मे ) च्या वृतपत्रात ’ इर्शाळगड’ वर माझा लेख प्रसिध्द झाला होता.
इर्शाळगड
पनवेल - खोपोली मार्गावरुन जाताना दिसणारा हा ईरशाळ गड
ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे.टेहाळणीसाठी या ठिकाणाच उपयोग केला असेल.
उन्हाळा सुरु होण्या अगोदर हा ट्रेक करुन या सिझनची सांगता करण्याचे ठरल्याने या सिझनचा शेवटचा ट्रेक ईरशाळला करण्याचे ठरले. ईरशाळला जाण्यास वाहतुकीची सोय असल्याने सोपे पडते.
ईरशाळला जाण्यास दोन मार्ग आहेत.पनवेल - खोपोली मार्गावर किंवा कर्जत - पनवेल या मार्गावर बसने प्रवास करीत चौक रेल्वेस्टेशनच्या स्थानकावर (डाक बंगला) उतरावे.रेल्वे मार्ग ओलांडून चौक गावात येता.समोरच मोरबे घरणाची भिंत दिसते.त्या जलाशयाच्या बाजुला गडावर जाण्याची वाट दिसते.
उन्हाळा वाढल्याने खूपच गरम होत होते.घामाच्या घारा सुरु झाल्या.सावळीला थांबून दम खात पुढाचा टप्पा गाठायचो.बाजुने इरशाळवाडीतील माणसे जात येत होती.
पहिला टप्पा इरशाळवडी पर्यतचा आहे. वाडीत दहा पंधरा घरे आहेत छोटीशी शाळा आहे.पाणी लांबून आणावे.आम्हाला वाडीतील एका घरातून पाणी मिळाले.बाटल्या भरून घेतल्या. वाडीपासून निघाल्यावर सरळ वाटेने गेल्यास चुकायला होते व मोठा घेरा पडतो. वाडी सोडल्यावर देवीचे छोटेसे मंदीर दिसते.तेथून थोडेसे पुढे जाऊन वर चढल्यास एरा वाचतो.आपण लवकर गडावर पोहचू शकतो. चौकहून ईरशाळगडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास लागतो. पायथ्या पासून ईरशाळवाडी मार्गे गडमाथा गाठण्यास दिड तास लागतो.
गडाच्या पाठीमागून चढण्याची वाट आहे. समोरुन उन्हाचा तडाका होता.पाठीमागे गेल्यावर सावली ळाल्यावर चढाईला वेगे आला.पाण्याच टाक लागते.लगेच पुढे लाकडी शिडी लागते.तेथेच विशाळादेवीचे छोटेसे मंदीर आहे.दर्शन घेऊन पुढच्या चढाईला लागलो.आता परीक्षा घेणारी चढाई होती.
इरशाळ ला नेड्यापर्यत जाणे सोयीचे आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे.या ठीकाणी अपघात झालेले आहेत.
गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते.
गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान,म्हैसमाळ, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
कितीही त्रास झाला तरी सर्व मित्रांसह केलेला ट्रेक आंनददायीच असतो.त्याची मजा वेगळीच असते.
No comments:
Post a Comment