इथे क्लिक करावे ===>> शिवतीर्थ रायगड
शिवतिर्थ रायगड
हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड.रायगड हा जाज्ज्वल्य अभिमान आणि आयुष्यभर पुरणा-या अंखड प्रेरणेचा उर्जासोत आहे.छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी व महाराष्ट्राची अस्मिता हृदयात साठवण्यासाठीरायगडावर जावेच लागते.
६ जून १६७४ रोजी याच किल्ल्यावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याची ही एक महत्वपूर्ण घटना असून महाराजांची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. राजधानीस आवश्यक असलेले गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. प्रचंड उंची, वर जाण्याचा एकच मार्ग, अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टीबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक, आणखी काय हवे होते. दुरदृष्टीपणा हा महाराजांचा महत्वपूर्ण गुण. त्याचीच साक्ष या किल्ल्याची निवड सहजतेने देते.मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते महाराजांच्या अंतिम काळापर्यंत राजांनी याच किल्ल्यावरून राज्य चालवले.
महाड या शहरापासून अवघ्या 24 कि.मी. अंतरावर पाचाड हे गाव आहे. या गावात राजमाता जिजाऊंचा वाडा, समाधी हे पवित्र तिर्थस्थळ आहे. येथील दर्शनाने मन शांत होऊन किल्ला रोहणास सुरूवात करता येते.
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.गडावर आपल्याला इतिहास खुणवत असतो.रायगडला जाण्यासाठी बसने आपण थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरूजापाशी पोहचतो.खूबलढा बुरूजापासून पायर्या चढावयास सुरवात करून रमत-गमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो.
पाचाड खिंडीतील गुहेला "वाघबीळ" म्हणतात.खूबलढा बुरूजापासून पुढे जाताना डाव्या बाजूस उंच कडा दिसतो ते टकमक टोक आणि उजव्या बाजूस हिरकणी टोक दिसते. महाद्वाराकडे जाण्यासाठी दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते. मात्र उंच चढण व उंच पायऱ्या यामुळे ही वाट परीक्षा पहाते.नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून त्याच्या आतील बाजूस महादरवाजा लागतो. दोन बुलंद बुरुजांच्या मध्ये असणाऱ्या या महाद्वाराची बांधणी अतिशय मजबूत आहे. काळ्या दगडांची ही सुबक बांधणी आतल्या अंगास पहारेकऱ्यांच्या देवड्यांनी युक्त आहे. दरवाज्याच्या कमानीवर दोन्ही बाजूस राजसत्तेचे प्रतिक असलेले सिंहासारखे शरभ हे प्राणी कोरलेले आहेत. पुढे गेल्यावर आपणास एक तलाव दिसतो हाच तो हत्ती तलाव. तेथून काही अंतरावर आणखी एक भव्य भव्य असा गंगासागर तलाव दिसतो. एका बाजूने चिरेबंदी दगडी बांधणीने बंदिस्त केलेला हा तलाव आजही रायगडावरील पाणीपुरवठयाचे काम करतो. पुढे महाराजांचा राजवाडा, राणीवसा ओलांडून आपण सिंहासनाच्या चौथऱ्यापाशी येतो. येथे धातूच्या सुंदर नक्षीकामाने मढविलेली मेघडंबरी आहे. येथेच समोरील बाजूस नगारखान्याची इमारत असून सिंहासन ते नगारखाना जवळपास १६० फुटाचे अंतर आहे. मात्र नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ उभे राहिल्यासही स्पष्ट ऐकू येते. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते.
पुढे होळीचा माळ तसेच तेथे असलेला शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा आहे,बालेकिल्ल्याच्या वायव्येस पीलखान्याची जीर्णशीर्ण वास्तू आहे. त्याच्या उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष जोत्याच्या रूपाने अवशिष्ट आहेत. दोन्हीकडील मिळून येथे एकूण चव्वेचाळीस दुकाने होती.माळाच्या डाव्या बाजूस असलेले शिकाई मंदिर आहे.तेथून ईशान्येस प्राकारात हेमाडपंती पद्धतीने बांधलेले जगदीश्वर महादेवाचे मंदिर असून त्याच्या प्रवेशद्वारापाशी मारुतीची सुरेख पाषाणमूर्ती आहे.दरम्यान डावीकडे असलेले टकमक टोक शिववैभवाची साक्ष देत शिवभक्तांना प्रेरणा देत उभे आहेत.मंदिराच्या पूर्व दरवाज्याच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. त्याच्या समोर इमानी वाघ्या कुत्र्याचेही स्मारक आहे. आलेला प्रत्येक शिवभक्त हा येथे नतमस्तकच होतो आणि शिवसमाधीचे तेजस्वी स्वरुप नजरेत भरुन पावतो.
रायगडावर पाहण्यासारख्या इतिहासाच्या खुणा आहेत. त्यात होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघ दरवाजा,बाजारपेठ, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे आहेत. महाराजांच्या होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारुची कोठारे अशीही अनेक स्थळे नजरेत व हृदयात साठवण्यासारखी आहेत. भवानी टोक आणि वाघ दरवाजा गडावरील सर्वात अवघड जागा असून त्यांची वाट सहजासहजी सापडत नाही.
रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे.
महाराजांच्या मृत्यूंनंतर जी प्रेरणा आजही प्रत्येक मराठी माणसाला जगण्याचं बळ देतं तिचा उदय यात किल्ले रायगडावर झालाय.रायगडावर आल्यावर तर तन मन अगदी शिवमय होवून जाते. कारण हे तर आमचे तीर्थक्षेत्र. इथला प्रत्येक चिरा ना चिरा आपल्या राजाची, त्यांच्या शौर्याची , पराक्रमाची , त्यांच्या सदहृदयी मनाची महती सांगतो. इथल्या एक एक प्रसंगाची आठवण करून देतो. ते सार पाहताना, अनुभवताना मनाची कधी समाधी अवस्था लागते तर कधी तना मनात आत्मविश्वासाचे नवे बळ संचारते.
प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय … जय भवानी, जय शिवाजी ……. हर हर महादेव !!!!
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
सेर सिवराज है ! सेर सिवराज है!
No comments:
Post a Comment