Thursday, February 18, 2016

बुलंद किल्ला लोहगड



                                  इथे क्लिक करावे  ===>> बुलंद किल्ला लोहगड








                                                 बुलंद किल्ला लोहगड


     गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा   प्रवेशमार्ग यापैकीच एक! सर्पाकार मजबूत तटबंदी. लोहगड किल्ला नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद  आणि अजिंक्य आहे.किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत ताठ मानेने उभी आहे.भक्कम बांधकाम्,प्रवेशद्वारांची अजोड सर्पाकार रचना यामुळे लोहगडवैशिष्ठ्यपूर्ण ठरतो.




        पुणे-मुंबई हमरस्त्यावरून लोणावळ्या नजीक डाव्या हातासलोहगड व विसापूर ही दुर्गजोडी आहे,कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मीती करण्यात आली असावी. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते.हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.




लोहगड लोणावळ्यापासून जवळच आहे. लोणावळ्यापासून एकच स्टेशन पुढे असलेल्या मळवलीला उतरून लोहगडावर जाता येते.मळवलीला उतरले की रेल्वे फाटक ओलांडून गेल्यावर एक लहानसा ब्रिज लागतो.हा ब्रिज मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या वरून जातो.तो ओलांडून मग आपण मळवली गावाच्या रस्त्याला लागतो.पुढेलोहगडाच्या रस्त्यावरच बौध्द्कालीन भाजे लेणी आहेत.मद्दाम थांबून पाहण्यासारख्या या लेण्या आहेत.इथून दिडेक तासात 'गायमुख' खिंडीत येऊन पोहचतो.तेथूनच पायथ्याच्या लोहगडवाडी या गावात जाता येत.आता डांबरी रस्ता झाला आहे.तिथल्या पठारावरून आपल्याला विसापूर दुर्ग आणि लोहगड दोन्ही एकमेकांसमोर पाहायला मिळतात.लोहगडावर जाण्यास पाय-या चढाव्या लागतात. 






       गडावर चढताना एकूण चार प्रवेशव्दार लागतात,हा मार्ग सर्पाकार असून शेवटच्या द्वारातून खाली पहिले असता अजोड सर्पाकार रचना दिसून येते हेच लोहगडाचे मुख्य आकर्षण आहे.त्यामुळे किल्ल्यावरच्या पहारेकऱ्यांस बाहेरून गडावर येणार्‍या माणसांवर नजर ठेवता येणे सोयीचे जाई.गणेश दरवाजा ,नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे,यावर मारूतीरायाचे शिल्प कोरलेले आहे.हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. 











       या दरवाज्यांतून आत शिरताच समोर एक दर्गा लागतो.शेजारी सदर व लोहारखानाचे अवशेष आढळता.त्याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. येथून उजवीकडे चालत गेल्यावर लक्ष्मी कोठी लागते.कोठीच्या पुढे चालत गेल्यावर एक छोटेसे शिवमंदीर आहे. तिथून पुढे चालत गेल्यावर एक मोठे तळे लागते.नाना फडणवीस यांनी या तळ्याची बांधणी केली, हे तळ सोळा कोनी आहे.या तळ्याच्या पुढे चालत गेल्यावर पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रूंद अशी डोंगराची सोंड आहे,गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यास विंचूकाटा हे नाव पडले.गडावरचे प्रमुख आकर्षण म्हणजे विंचूकाटा माची. ह्याला विंचूकडा असेही म्हणतात.     राजगडाला जशी सुवेळा- संजीवनी माची, तोरण्याला जशी झुंजार-बुधला माची तशीलोहगडाची ही विंचूकाटा माची. विंचवाच्या नांगीप्रमाणे बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारी! हा गडाच्या पश्चिमेला आहे. थोडं लांबून पाहता हा भाग गडापासून वेगळा झाल्यासारखा दिसतो. वरून पाहिल्यास याचे टोक विंचवाच्या नांगीसारखे दिसते. म्हणूनच त्याला विंचू काटा माची म्हणतात. हा गडाचा टेहेळणी बुरुज. इथून आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचे अवलोकन करत येते. हा भाग जवळपास १५०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे.



नेताजी पालकर ह्या गडाचे पहिले किल्लेदार. पण १६६५ च्या पुरंधरच्या तहात तो मिर्झाराजे जयसिंग यांनी मुघल सल्तनित नेला. १६७० साली राजांनी तो परत स्वराज्यात आणला. पुढे शाहू महाराजांनी तो कान्होजी आंग्रेंना दिला. नाना फडणविस ह्या पेशवाईतील कर्तृत्त्ववान पुरुषाने ह्या गडाला नवे रूप दिले. पेशवाईचा खजिना नानांनी येथील लक्ष्मीकोठीमध्ये आणून ठेवला. नंतर दुस-या बाजीरावाच्या काळात मराठी साम्राज्याची जी वाताहत झाली त्या वेळी इंग्रजांनी एकही गोळी न झाडता हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.असा या गडाचा इतिहास 
सांगितला जातो.














या गडावरून विसापूर,तुंग,तिकोणा,कोरीगड,सिंहगड,तोरणा गड दिसतात.व पवनाधरणाच्या    परिसराचे उत्तम दर्शन होते.गडाच्या पयथ्याच्या लोहवाडी मध्ये राहण्याची व खाण्याची सोय होते.संध्याकाळी तर या साऱ्या भागालाच जणू एक झळाळी येते. इथली खेडी, रस्ते, शिट्टय़ा मारत धावणारी रूळवाट, भातखाचरे, डोंगर, चमचमते पाणी घेत वाहणाऱ्या नद्या असे सारेच विलोभनीय वाटू लागते. 




भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.








No comments:

Post a Comment