Showing posts with label हिमालयातील भंमती. Show all posts
Showing posts with label हिमालयातील भंमती. Show all posts

Sunday, October 17, 2021

नयनरम्य परिसर....केदारनाथ

 



केदारनाथ...पवित्रता व सुंदरता  

चारधाम यात्रेत आम्ही ’गंगोत्री’ ला ’गंगा’ देवीचे दर्शन घेऊन केदारनाथ या महत्वाच्या तीर्थक्षेत्राकडे निघालो. प्रवास कधी उंच पर्वतांच्या कड्याहून तर कधी पायथ्याच्या नदीच्या बाजुने सुरु असतो. सोनप्रयाग पर्यत ४०० किमीचा व नऊ तासाचा प्रवास होणार होता. चार धाम यात्रा ही अत्यंत सुलभ परंतु सर्वात कठीण प्रवासांपैकी एक आहे. हिमालयातील रस्त्यांवर शारीरिक आणि मानसिक त्रास अनुभवण्यासाठी तयारी असली पाहिजे.

सोनप्रयाग हे केदारनाथ घामकडे जाणारे धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे. तेथे आम्ही रात्री मुक्कामासाठी पोहचलो.सकाळी लवकर उठून गौरीकुंड च्या दिशेने निघालो. गौरीकुंड हे केदारनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या १६ किलोमीटरच्या पायी प्रवासाचा सुरुवातीचे ठिकाण आहे.गौरीकुंडमध्ये देवी पार्वती देवीला समर्पित मंदिर आहे, गौरी देवी मंदिर. ही ती जागा आहे जिथे पार्वती देवीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी ध्यान केले होते.

पत्नी बरोबर असल्याने ट्रेक न करता दोन घोड्यांवर दोघांनी बसून गौरीकुंडापासून सकाळी लवकरच प्रवास सुरु केला. मी पहिल्यांदाच घोड्यावर बसलो होतो. फार विचित्र व वाईट वाटत होते. पायी चालणारे यात्रेकरू व समोरुन येणारे घोडे यातून मार्गक्रमण करीत चढाई सुरु होती. एकाबाजूने खोल दरी व दुस-या बाजुला पर्वताचा कडा अशा अरुंद वाटेवरून प्रवास सुरु असतो. वाट चांगली बांधून घेतलेली आहे.दरीच्या बाजुला रेलींग आहे.घोड्यांची घाण उचलायला साफसपाई करणारे कर्मचारी असतात.कोसळणारे धबधबे व हिरवाई असे सुंदर निसर्ग पाहत पाहत प्रवास सुरु होता. काही अंतरानंतर पठारावर आलो. ग्लेशियरच्या बाजुने जाताना थंडावा जाणवत होता. चढ उतारातून वाटचाल सुरु होती. मंदिर कधी दिसते याची उत्सुकता वाढली होती. घोडे थांबले,तेथे आम्ही घोड्यावरून उतरलो. घोड्याचे आभार मानून मंदिराच्या दिशेने पायी निघालो. मंदिर दिसताच नतमस्तक झालो. केदारनाथांचे दर्शनाने समाधान मिळाले व प्रसन्न वाटले. मंदिराच्या बाजुचा निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे. देव व निसर्ग या दोन्ही गोष्टीमुळे एकाच ठिकाणी असल्याने  तेथून पाय निघत नाहीत. केदारनाथ येथील सुंदरता अवर्णनीय आहे.        


केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन भव्य शिव मंदिर असून रुद्र हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.अतिशय निसर्गरम्यपणे ठिकाण आहे.त्याच्या सभोवताल उंच, बर्फाच्छादित पर्वत आहेत ते उन्हाळ्यात हिरव्या कुरणात व्यापतात. मंदिराच्या पाठीमागे उंच केदारडोम शिखर आहे. केदारनाथ मंदिर परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.त्यावेळी मंदिर बंद असते.  


भगवान केदारनाथ मंदिर उंच बर्फाळ पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे.पहाटे या बर्फाळ पर्वतांवर सुर्याची पहिली किरण पडतात.त्यावेळी पर्वतांची शिखरं सोनेरी रंगानी उजळून निघतात. तेव्हा भगवान केदारनाथानी सोनेरी मुकुट परिधान केलेला दिसतो. दिवसभर पर्वतांवर सुर्यकिरण पडतात तेव्हा शिखरं चांदीसारखी चमकतात. भगवान केदारनाथ पहाटे सोनेरी व नंतर दिवसभर चांदीचा मुकुट परिधान करुन असतात. संपूर्ण केदारनाथ धामचे वातावरण भक्तिमय असते.     

हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर सहा फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर असलार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड स्लॅब किंवा सिमेंटशिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिराच्या बाहेर  पाहरेक-याच्या  रूपात नंदीची स्थापना केलेली आहे.

२०१३ मध्ये झालेल्या महाभीषण प्रलयालामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात खुप बदल झाला आहे. मंदिरामागे मोठी शिळा येऊन थांबली आहे, असे म्हणतात की या ’भिमशिळे’ मुळे मंदिराचे नुकसान झाले नाही.

या ठिकाणी वातावरण कधीही बदलत असते परंतु त्यातल्या त्यात एप्रिल, मे महिन्यापासून वातावरण खुप चांगले असते ते नोव्हेंबर पर्यंत. म्हणुनच यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम मंदिराची दरवाजे हिंदू पंचांगनुसार अक्षय तृतीया या दिवशी उघडतात आणि दिवाळी पासून बंद होतात.

भारतातील सर्वात पवित्र व प्रसिद्ध मंदिरापैकी एक केदारनाथ  मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही दरवर्षी लाखो श्रद्धाळू केदारनाथ चरणी लीन होण्यासाठी या मंदिराला भेट देतात. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराला जीवनात एकदा तरी भेट द्यावी.



Wednesday, September 15, 2021

स्वप्नवत वाटणारी सफर

 



         दि.१६ सप्टेंबर २०२१... महाराष्ट्र टाईम्स ..पुरवणी



स्वप्न सफर...नुब्रा व्हॅली 


लेहमधली प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन दुस-या दिवशी नुब्रा व्हॅलीच्या दिशेने निघालो. रस्त्यात ’खारदुंगला पास’ पार करावा लागतो. लेहलडाखची सहल उत्सुकता, उत्साह व भीती या संमिश्र भावनांनी सुरु होते. वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता.जसे जसे वर जात जातो तसा हवेतला ऑक्सिजन कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत राहतो. खारदुंगला टॉपला पोचलो तेथे अधिक वेळ न दवडता पटकन दोन फोटो काढून आम्ही पलीकडल्या बाजूस उतरायला सुरुवात केली. नुब्रा आणि श्योक खोर्‍यांना लेहशी जोडणारा हा संपूर्ण रस्ता जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनकडे जाणारा असल्याने कायम कडेकोट बंदोबस्तात असतो. लष्कराचे अस्तित्त्व पावलोपावली जाणवते. तेवढीच मेहनत रस्ता कायम सुरू ठेवणासाठी घेतली जाते. वळणावळणाचे रस्ते असले तरी खड्डे नसलेली डांबरी सडक होती. डावीकडे उत्तुंग पर्वत आणि उजवीकडे अतिशय भयावह खोल, पाताळाचाही ठाव लागणार नाही अशा घळी.त्यांच्या मधून जाणारा अतिशय अरुंद रस्ता.गाडीत जीव मुठीत धरुन बसावे लागते.


देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण खार्दुंगला पासच्या खाली असलेल्या छावण्यांमध्ये सजग असणार्‍या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन आपल्याला थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत ह्याचीही जाणीव होते.


श्योकनदीच्या काठाकाठाने पुढे सरकत होतो तसा श्योक आणि नुब्रा खोर्‍यांचा अद्भुत सौंदर्याचा अजोड ठेवा आमच्यासमोर उलगडत होता.नुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता आणि त्याची सोनेरी आभा आसपासच्या पर्वातांवर उमटली होती. सर्व शिखर सोनेरी दिसत होती. पायथ्याशी रुप्याचं पाणी घेऊन वाहणारी श्योक नदी. नदीकाठावर चिमुकली गावं आणि काही ठिकाणी आर्मीची क्वार्टर्स. या खोर्‍यात उतरल्याबरोबर काहीतरी वेगळ्यात विश्वात आल्याचा भास होत होता. सगळाच सोन्याचा चमचमाट, नदीत रुप्याच लखलखाट. दूरवर धुंद झालेले पर्वत संध्याकाळ जवळ आल्याची नांदी.


डिस्कीट येथे नुब्रा आणि श्योक नद्यांचा संगम होतो. दोन वेगवेगळ्या खोर्‍यांतून आलेल्या नद्या आपापले अस्तित्व विसरुन एकमेकांत लीन होतात. पुढचा पूर्ण रस्ता श्योक नदीच्या काठाने होता. श्योक नदीचे अवाढव्य पात्र बघून असे वाटत होते कि हिला खरोखर शोकांतिका लागली आहे. एवढे मोठे पात्र असून पण नदी पूर्ण कोरडीच आहे. तो नजारा रस्त्यातून पाहत पाहत पुढे हुंडरचा प्रवास सुरु ठेवला.  

 

हुंडर हे गाव (cold desert) थंड वाळवंट, तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता या साठी प्रसिद्ध. पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव. बाजूला शेती.झुळझुळ वाहणारी नदी. उंच उंचीच्या थंड वाळवंटांनी वेढलेले एक आश्चर्यकारक निसर्ग,  वाळूचे ढिगारे व नयनरम्य पर्वत - थोडक्यात, ही नुब्रा व्हॅली आहे. नुब्रा व्हॅलीच्या अद्वितीय हुंडर प्रदेशाच्या सौंदर्याबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, ही एक जादुई भूमी आहे जी शब्दात पकडली जाऊ शकत नाही! विस्तीर्ण वाळूच्या पात्रात प्रवाहाने रांगोळय़ा रेखत जाणारी शायोक नदी, वाळवंटातील वाळूवाळूच्या टेकडय़ा, तिच्यामध्येच हिरवळ, रंगीबेरंगी बोडके डोंगर आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट! सृष्टीतील सर्व वैविध्यं तिथं एकवटलेलं. हुंडरमध्ये वाळूचे ढिगारे आणि श्योक नदीचा विस्तृत विस्तार आहे. सुमारे दहा हजार फूट उंचीवर वसलेले, हंडर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे. नेत्रदीपक परिसराला नयनरम्य पार्श्वभूमी प्रदान करते. नदीच्या किनारी पसरलेलं वाळवंट आणि त्यामागोमाग उत्तुंग पर्वतरांगा व त्यावरील बर्फाच्छादित शिखर अशा निसर्गातील परस्परविरोधी गोष्टी एकाच जागी दिसण्याचा चमत्कार केवळ नुब्रा व्हॅलीतील हुंडर या ठिकाणी अनुभवता येतो. नुब्रा व्हॅलीचं वैशि‍ष्ट्य म्हणजे पाठीवर दोन उंचवटे असणारे उंट इथे बघायला मिळतात. प्राचीन व्यापार मार्गाने प्रवास करणारे व्यापारी हे उंट माल वाहण्यासाठी वापरत असत. या उंटावर बसून वाळवंटात बसून सफर करता येते. वाळवंटातील ही सफर म्ह्णजे एक वेगळाच अनुभव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे. सतत बदलत राहणारे लँडस्केप हि लडाख ची विशेषता.


नुब्रा व्हॅलीतील या रस्त्यावर डिस्कीट ही जगप्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. ही लडाख मधील सर्वात जुनी आणि मोठी मॉनेस्ट्री समजली जाते. चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाहुन दुर दुर पर्यन्त मानवी वसाहतीची कुठलीही खूण दिसत नाही.  मॉनेस्ट्री च्या बिल्डिंग वर १०६ फूट उंचीचा श्योक नदी कडे तोंड करून मुकुट घातलेला जाम्पा (मैत्रेय) बुद्धाचा बसलेला पुतळा आहे.  मॉनेस्ट्री च्या अंगणातून श्योक नदीचा सुंदर देखावा दिसत होता.


मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्‍याचं काळं करणारं रणरणतं ऊन निसर्गाची वेगवेगळी म्हणजे अप्रतिमपासून अक्राळविक्राळ रौद्र रुपं बघून आपण स्तिमित होतोच पण निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही हे प्रकर्षाने जाणवतं. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्‍या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. हेच ते लडाखी स्वप्न. लेहलडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न साकार झाले. 


लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन तृप्त होत नाही. निसर्गाने निर्मलेल्या या अनोख्या विश्वाची प्रत्यक्ष भेट घेण हाच खरा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय अनुभव असेल!

Monday, June 14, 2021

नेपाळ

 



उंचशिखरांचा देश...नेपाळ  


आपल्या देशाच्या शेजारील एकातरी राष्ट्रात पर्यटनाला जाण्याचा विचार खूप दिवसापासून मनात घोळत होता.’साळुंके टूर’ या कंपनीची जाहीरात वाचून जाण्याचे नक्की केले. कमी पैशांमध्ये ऍडव्हेंचर, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेची परदेशी टूर करायची असेल तर नेपाळ सारखे दुसरे आकर्षक ठिकाण नाही.नेपाळला ‘भटकंतीचा स्वर्ग’ देखील म्हटले जाते.पर्यटन हा नेपाळचा प्रमुख व्यवसाय असल्याने व या देशाचा इतिहास बघितला तर या देशावर दुसऱ्या कोणत्याही देशाने राज्य केले नाही आणि ते कुणाचे गुलामही बनले नाहीत त्यामुळे येथे स्वतंत्रदिवस साजरा केला जात नाही. नेपाळ हा देश जगातील तीन हिंदू राष्ट्रांपैकी एक आहे.हे विषेश असल्याने नेपाळला भेट देण्याची माझी खूप इच्छा झाली होती. भूकंपामुळे या देशाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. सहलीत आम्ही नेपाळ मधील चितवन ,पोखरा, काठमांडू व भारतातील गोरखपूर या शहरांना भेट देणार होतो. नेपाळ मध्ये तसे पासपोर्ट ची गरज लागत नाही तुमच्या कडे कोणतेही एखादे भारतीय ओळख पत्र असेल तर चालते जसे आधार कार्ड. 


भौगोलिक संपन्नतेने नटलेले, अनेक देव देवातांची मंदिरे असलेला हा हिंदुराष्ट्र लहान असला तरी धार्मिक वातावरणाने तो एकमेकांशी भावनिक नात्याने जोडलेले आहे.नेपाळचा उत्तर भाग हिमालयाने घेरलेला आहे. जगातील दहा सर्वात उंच शिखरापैकी आठ शिखरं नेपाळ मध्ये आहेत. जगातील सर्वात उंचशिखर एव्हरेस्टही नेपाळमध्‍ये आहे.मी गिर्यारोहक असल्याने जगप्रसिध्द हिमालयातील उंचशिखर पाहण्यास खास आलो होतो.


गोरखपूर येथून ’सुनौली’ पर्यत प्रवास करून नेपाळ मध्ये प्रवेश केला. पहिले ठिकाण ’चितवन’ येथील ’नॅशनल पार्क’ जंगल सफारीची मजा घेता आली. पहाटे थंडीत खुडखुडत उघड्या जीपमधून जंगल सफारी गेलो.हरीण, डुक्कर व पक्षी पाहायला मिळाले. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले हे जंगल इतिहासकाळात नेपाळच्या राजघराण्याचे शिकारीचे जंगल होते. या अरण्याचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे दुर्मिळ होऊ लागलेल्या घरियाल मगरी, धोक्यात आलेला एकशिंगी गेंडा आणि संरक्षणाची गरज असलेला पट्टेरी वाघ, हे तीन महत्वाचे प्राणी इथे आहेत.



पोखरा हे काठमांडू शहरांपासून २०३ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील फेवा सरोवर जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. सरोवरात नौकाविहारास पर्यटकांची गर्दी असते. फेवा सरोवराच्या शांत निर्मळ पाण्यात दिसणारे माउंट फिशटेल आणि इतर हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहता येते. हिमशिखरांच्या गराड्यात, हिरवाईचा लेवून वसलेलं पोखरा हे नेपाळमधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अन्नपूर्णा रांगेतल्या हिमशिखरांचा बॅकड्रॉप लाभलेले पोखरा आज पर्यटकांना शुध्द हवा, आल्हाददायक वातावरण आणि डोळे सुखवणारा निसर्ग ह्याने खूश करते. पोखराला भेट दिल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण म्हणजे ‘डेवीस फॉल’ हा धबधबा. या धबधब्याच्या जवळच गुप्तेश्‍वर महादेव आहे. नावाप्रमाणे हा महादेव-शंकर अनेक वर्ष जमिनीत गुप्त होता, आता त्याच्या गुहेतील मंदिराचे दर्शन घेता येते. गिर्यारोहणाचा दस्तऐवज जपणारे आणि माउंटेनियर्सचं विश्‍व उलगडून दाखवणारे इंटरनॅशनल माउंटन म्युझियम आहे.



काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. भारतातून नेपाळला येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला दर्शन घ्यायचं असतं ते काठमांडूच्या पशुपतीनाथाचं. नेपाळी पगोडा शैलीत बांधलेल्या या मंदिराला असलेली चार प्रवेशद्वारे चांदीने मढवलेली आहेत. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे आणि गाभार्‍यातील शिवलिंग सुमारे सहा फूट उंचीचं आहे.आम्ही काठमांडू येथे महाशिवरात्री या दिवशी असल्याने पशुपतीनाथाच्या मंदीर परिसरारात खुप गर्दी होती.मोठी जत्रा भरली होती. काठमांडूपासून १० किमी अंतरावर शिवपुरी टेकडीजवळ बुढा नीलकंठ मंदिर आहे. मंदिरात शिवाची चतुर्भुजी मूर्ती पाण्यामध्ये निद्रावस्थेत अतिशय सुंदर आहे.काठमांडूच्या जवळच असलेले भक्तपूर हे शहर १५ व्या शतकात मल्ला राजघराण्याची राजधानी होते.या राजवैभवाच्या खूणा इथल्या दरबार चौकातील वास्तुंच्या रुपाने आजही पाहायला मिळतात. 


पोखरा ते काठमांडु या शहरांच्या मध्ये उंच डोंगरावर वसलेल्या मनोकामना देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. वर पोहचण्यास केबल कारने जावे लागते.खाली वाहणा-या नदीचा नजारा पाहण्यासारखा आहे.


लुंबिनी येथील साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट दिली. एक सुखद आणि मनाला शांती देणारे स्थळ पाहून धन्य झालो. 


भारतात प्रवेश केल्यावर गोरखपूर येथील गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु केला. 


आमच्या सफरीच्या वेळी नेपाळ मधील सगळ्या शहरात ढगाळ वातावरण असल्याने हिमालयातील उंचशिखर पाहता आली नाही. ती शिखरं विमानातून पाहून आमची नाराजी आम्ही दूर केली. पण ती शिखर जमीनीवरून पहायची असल्याने पुन्हा नेपाळ सफर करणार आहे.


Tuesday, July 24, 2012

सौरकुंडी पास

मघल्या काळात महाराष्ट्रात खुप पद्भ्रमण केले. २००६ सालातल्या मे महीन्यात युथ होस्टेल ने कुलु-मनालीच्या दर्या खोर्यात पद्र्भ्रमण आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी माझ्या मुलासह भाग घेण्यासाठी नांव नोंदंणी केली.आमच्या बरोबर माझ्या दोन मित्राने भाग घेण्याचे ठरवुन पैसे भरले. हिमाचलमघ्ये हुंदडायला मिळणार म्हणुन मला व सोबतीला मुलगा असल्यामुळे आनंद झाला.





माझ्या मुलाला खुप लवकर लहान वयातच ही संघी मिळाली होती. दहावीची परीक्षा दिल्याबरोबर तो तयारीला लागला. त्याने साहीत्य जमा करण्यास सुरुवात व चाढण्याचा व उतरण्यास सराव म्हणुन छोटे ट्रेक केले. चोघे जण सर्व साहीत्य घेउन बबेली या बेस क़ँप्मला पोहचलो. कँम्प चागल्या लोकेशन टेंट लावुन वसविला होता. थंडीतही आमचे वाँर्म वेलकम केले. 




उंच उंच बर्फाचे पर्वत व घनदाट जगंले आणि खळखळत घावणारी नदी पाहुन तब्तेत खुष झाली. दोन दिवस वातावरणाची सवय होण्यासाठी आम्हाला बेस कँम्पवरच व्यायाम व एक छोटा ट्रेक साठी ठेवुन घेतले. प्रसन्न वातावरणात ताजेतवाने राहुन थकवा येत नाही. रोज रात्री कँम्प फायरला तर जुगलबंदि असायची पण दहा वाजत्ता सर्वानी झोपले पाहीज अशी त्याचा आग्रह असायचा.आमच्या बँच मघ्ये गुजरात,पुणे,आंघ्र,ओरीसा,बँगलोर मघले ट्रेकर होते.पण कँम्प फायरलासर्वजण एकत्र होउन दुसर्या बँचवर तुटुन पडायचो. 





उत्साहात व टाळ्याच्या गजरात व कँम्पवरील लिडरांचे निरोप व सदिच्छा घेउन आम्ही ट्रेकची सुरुवात केली. पहील्याच दिवशी लिडर असुन देखील आमच्यातले काही जण रस्ता चुकले व त्यामुळे आमचा खुप वेळ वाया गेला. छोटया गावात थांबुन जेवलो व उन्हातुन पुढ्चा रस्ता धरला. सेगली हा कँम्प डोंगर उतारावर होता.सफरचंदाच्या बागेतच तंबुत आमचे वास्तव्य होते







.पुढचा ट्रेक खुपसा उभा चढायचा होता.आज सकाळपासुनच उन्हे असल्यामुळे खुप त्रास झाला. दुपारी जगंलातच मागच्या कँम्पमघुन घेतलेला टिफीन खाल्ला.पावसाचे ढग जमु लागल्यामुळे बँचला पटापट चालण्याची सुचन देण्यात आली.दाट जंगलात मोठया मोठयाझाडांच्या बुदयातच हा कँम्प बसवला होता. पावसाने सुरुवात केली. आम्ही लगेच तंबुत घुसलो.थंडी वाढली.वीजा चमकुलागल्या.गडगडाट जोरात होउ लागला.आपल्या जवळ्च हा आवाज होत आहे असे वाटायचे व आवजही मोठा असायचा.असे वादळ पाहुन भिती वाटली.पावसाने जोर घरला.




आम्ही स्लिपींग बँगमघ्ये घुसलो. हा 'होरा थँच ' कँम्प मोठमोठ्या झाडांखाली मोकळया जागेत स्थापला होता. दुसर्या दिवशी पहाटे पाउस ओसरुन चांगला सुर्यप्रकाश पडला होता. आजच्या दिवसाचा ट्रेक सपुंर्ण कडक सुर्यप्रकाशात झाला.त्यामुळे उन्हाचा लागलाच त्रास झाला.आम्ही उंचीवर असल्यामुळे उन जास्त लागत होते. आज पहील्यांदाच बर्फाच्या जवळ आलो होतो.निसर्गातला बर्फ प्रथमच हाताळला.सर्वजणानी एकमेंकावर बर्फ उडवुन मजा केली. आजुबाजुला उंच उंच पर्वताने बर्फाचे पाघंरुन घेतेलेले दिसत होते.मघ्ये थोडा आराम करुन लवकरच 'मैली थँच'याकँम्प वर पोहचलो.कँम्पचे लोकोशन सुदंर होते. हा कँम्प १०००० फुटांच्या उंचीवर वसलेले आहे.डोगंराच्या उतारावर तंबु टाकले होते.प्रार्तविघी साठी खुप लांबवर जावे लागत होते.छोटासा ट्रेक करावा लागयचा. 



या ट्रेक मघली ही सघ्यांकाळ आठवणीत राहण्यासारखी आहे.प्रसन्न वातवराणात सर्व थकवा दुर झाला.आकाश स्वच्छ असल्यामुळे सुर्यास्त पाहण्यास मिळाला. सर्वजण खुशीत व मजेत वाटले.आजचा कँम्प फायर मस्त झाला सर्वानी घमाल केली. दुसर्या दिवशी पहाटे उठुन निघण्याच्या तयारीला लागलो.तेवढयात बाजुच्या तंबुतुन घाप लागलेल्या माणंसाचा आवाज येऊ लागला.आम्हाला वाटले कोणीतरी थकल्यामुळे आवाज येत असेल म्हणुन आम्ही प्रथम र्दुलक्ष केले.पण आवाज वाढत गेल्याने आम्ही चौकशी केली. काल रात्री पुढच्या कँम्पचेलिडर श्रीयुत. आजारी पडल्यामुळे त्याना आमच्या कँम्पवर उचलुन आणण्यात आले होते.त्यांचा आजार वाढला होता.आम्ही त्याना तंबुतुन बाहेर काढले. त्याचा खुपच दमा वाढला. आम्ही घाबरलो व आमच्या बँच मघल्या डाँक्टराना बोलावुन आणले. त्यांनी चेक करुन त्याना काही गॉळ्याची ताबडतोब गरज असल्याचे सागितले.त्याची प्रक्रुती खालावलेली होती.कँम्प लिडरने बेस कँम्पला संपर्क करुन या तातडीची माहीती दिली. कँम्प वरील वातावरण लगेच बदलले व सर्वजण टेंन्स झाले. सर्वाची धावपळ सुरु झाली.काहीच निर्णय घेता येत नव्हता. त्याची घरघर आता खुपच वाढल्यामुळे आम्ही धाबरलो होतो. सर्वानी उंचलुन त्याना तंबुत नेउन ठेवले.काही वेळात त्याची घरघर मदांवत चालली होती. आमच्या बँचमघले डाँक्टर पुन्हा तंबुत त्याना पाहण्यास आत शिरले आणि तसेच बाहेर आले. शांतपणे त्यांनी कँम्प लिडर 'नो मोअर'असे सर्वाना सागिंतले. तसे सर्वजण स्तब्द व निशब्द झाले. सर्वत्र भयाण शांतता पसरली. त्या थंडीत ह्या घटनेने तर आम्ही पुरते गोठुन गेलो. आम्हाला पुढच्या प्रवासाची भिती वाटली.बेस कँम्पला सर्पक साधुन घटनेची माहीती दिली. आम्ही बेस कँम्पच्या आदेशाची वाट पाह्त होतो. या कँम्प लिडरने कालच्या वादळात स्वत: भिजुन आमच्याअगोदरच्या बँचमधल्या ट्रेकरची व्यवस्थित सोय करुन सर्वाची काळजी घेतली होती. त्या धावपळीत या कँम्पलिडरने स्व:ताच्या तब्तेतीची जराही काळजी घेतली नाही. त्याचा हा असा शेवट झाला होतो.





 बेस कँम्पच्या आदेशानुसार आमच्या बँचला ह्या कँम्पहुन लवकरात लवकर प्रयाण करण्यास सांगण्यात आले.लगेचच आम्ही या कँम्प लिडरला मानवंदना देउन पुढच्या प्रवासाला ह्या घटनेची भिती मनात ठेवुन निघालो. यांचे मरण आमच्या कायमच्या स्मरणात राहीले. 




त्या दिवशी आमचा ट्रेक एकदम शांततेत सुरु होता.मग कँम्प लिडरने आम्हाला समजावले व जोक्स सांगुन टेशन घालविले. ती घटना तशी पटकन विसरता येण्यासारखी नव्हती.आठवणीने भिती वाटत होती. मी माझ्या मुलालाही घेउनआलो होतो म्हणुन मला त्याची जास्त काळजी वाटत होती. अशा घटना पाहुन तो मनातुन बिथरु नये असे वाटत होते. दुपारनतंर आम्ही सकाळ्ची घटना विसरुन आमची गाडी पुन्हा रुळावर येउ लागली. मोठी चढ चढुन आल्यावर एका ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी थाबंलो.माझी सँक बाजुला ठेवून मी पाणी पिऊन बाजुला बसलो होतो. एवढयात माझी बँग हळली व सँक सरकुन खाली दरीमघ्ये घरंग़ळत जाऊ लागली.




जवळ नसल्यामुळे तिला कोणीच थोपवू शकला नाही. सँक दगडांवर आपटत आपटत खालीगेली आणि दिसेनाशी झाली.सगळेजण पाहत बसले.बँगमघ्ये कपडे व जरुरीच्या वस्तू होत्या. 
मी माझा पुढचा ट्रेक कसा करायचा याचा विचार करीत होतो. त्यादिवशीच्या आमच्या लिडरला आम्ही सर्वानी खाली उतरण्यास सागिंतले . तो तसाच वेळ न घालवता झरझर खाली उतरत 
गेला. आम्ही वरुन त्याला सुचना देत होतो.तो वेगात खाली तळाला पोहचला. त्याला तेथे माझी सँक कोठेच दिसत नव्हती. तो इकडे तिकडे शोघताना दिसत होता. आम्ही वरुन ओरडून त्याला आणखी खाली उतण्यास सागत होतो. त्याप्रमाणे तो खाली उतरल्यावर त्याला एकदाची सँक दिसली पण ती अडगळीच्या ठिकाणी जाऊन पडली होती.आम्हाला त्या ठिकाणी पोहचण्यास खूपच कठिण होते पण तो त्या परीसरातीला असल्यामुळे त्याने त्याठिकाणी पोहचून एकदाची त्याने माझी सँक वर काढली . वर चढुन आल्यावर तो खूप दमलेला होता. त्याला सर्वानी पाणी,खाउ दिला व त्याचे आभार मानले.





 मी त्याला त्याच्या परीश्रामाची किंमत म्हणुन त्याला पैसे दिले. प्रथम त्याने पैसे घेण्यास नाकारले पण सर्वाच्या आग्रहामुळे सकोचित होउन स्विकारले. तेथून त्याची आमच्या बरोबर चांगली मैत्री झाली. पुढे पावसाची चिन्हे दिसू लागल्याने आम्ही भरभर चालत होतो. पाउस पडला नाही. पण पावसाच्या वेळेचे निसर्ग पाहावयास मिळाले. बर्फाच्या ओढयातून (ग्लेशियर) आमचा पहीलाच प्रवास सुरु झाला. आम्ही सावधातेने व सावकाशीने पुढे पुढे सरकत होतो. एकामेकांना साभांळत व लिडरच्या सुचनेचे पाळण करीत वाटचाल सुरु होती. मोठे मोठे पठार दिसू लागले. 


झाडे कमी दिसत होती.बर्फाचे प्रमाण वाढू लागले. बर्फ उंचावरुन खाली उतरत जात असलेला भास होतो. त्यावरुन चालताना भीती वाटायची.मी व मझा मुलगा पाठोपाट काठीच्या आधारने चालत होतो.येथे चालताना काठीची मदत होते व मोठा आधार मिळतो.ती बर्फात खुपसायची व नतंर आपल्या पायाची हालचाल करायची.
सेगली ७०००
होरा ९०००
मैली १०५००
डोरा ११३००
सौरक़ुंडी पास १२९००
लोंगा १००००
लेखणी ८१००
(बेस कँम्प) बबेली ७०००
या कँप्मवर आम्ही वास्तव्य केले होते.

सिंथन पास व मार्गन पास

१९८६ साली मी माझ्या चार मित्रासह पुण्यातल्या युवाशक्तीने आयोजीत केलेल्या चौदा दिवसाच्या काश्मीरमघल्या सिंथन पास व मार्गन पासच्या ट्रेकला गेलो होतो. एक महीना घराबाहेर होतो पण या दिवसात घरची कधीच आठवण आली नाही येवढी मजा केली होती. दिवसभर संसार पाठीवरच्या सँकमघ्ये घेउन पदभ्रमण करीत वेगवेगळ्या तेरा कँम्पवर रोज रात्री कँम्प फायर करुन थकवा घालवुन तंबुत झोपी जात असायचो. काय ते दिवस आनंदाचे होते.




चौदा दिवस आघॉंळ केली नव्हती एवढी थंडी होती.स्वर्गात फिरत आहोत असा भास त्यावेळेला झाला. कीतीही फोटो काढले तरी समाघान होत नव्ह्ते.



 उभी चढ चढताना दम लागल्यानतंर खुप वेळ विश्नांती घ्यावी लागे. एकामेकाच्या पाठीमागुन रांगेत लिडरच्या संगतीत गाणी म्हणत चढाई करायचो. 



घनदाट जगंले,बर्फाची पर्वते,खळखळत्या नदीच्या प्रवहासह चालत चालत एकेक कँम्प पार करत पुढे जात रहायचो. आमचा १३००० फुटाच्या उंचीपर्यत पायी प्रवास झाला.या उंचीवरुन आम्ही जग पाहीले आहे.




 हिमालयात स्वच्छंदी फिरण्याची संघी या ट्रेकमुळे आम्हाला मिळली.पुन्हा असा योग केव्हा येईल हे माहीत नव्हते पण आता तरी आम्ही मनसोक्त मजा केली. अपरीचित संस्क्रुतीची जवळुन ओळख झाली. आयुष्यात ही मडंळी फक्त तीनंदाच आघोंळ करतात.एकदा जन्मल्यावर दुसर्यादालग्नाच्यावेळी व तिसर्यादा मरण पावल्यानतंर अशी माहेती एका या विभागातील सुशिक्षीत व्यक्तीने दिल्याने आम्ही आष्चर्यचकीत झालो. 




या विभागातले स्त्रीयांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते असे एकले होते.सुंदरता पाहुन आम्ही थक्क् झालो.पण स्वच्छते बद्दल विचारु नका. ही मडंळी खुपच घाणेरडी असता थंडीमुळे आंघोळच करीत नाहीत. ह्या परीसरात खुपच गरीबी आहे.थंडीमघ्ये बर्फामुळे तर ही मडंळी घर सोडुन खालच्या भागात उतरतात. थंडी व बर्फ ओसरल्या नतंर परत आपल्या घरात परतात.स्त्रियाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. पण त्या गलिच्छ असतात.कारण आंघोळ प्रकार त्याना माहीत नाही.



 'ग्लोशियर' हा बर्फाचा खडक पाहीला.यावरुन चालत जाताना जपुन जावे लागते.या खडकाखालुन पाणी वाह्त असते. हा खडक पुढे जाउन नदीला मिळतो त्यामुळे खुपच जपुन चालावे घसरलो तर वेगाने वाहणार्या नदित पडु शकतो. वाटेने चालताना मेंढ्या,शेळ्या,घोडे व खेचरे सोबतील असतात.



                                              वेगात घावणा-या नदीची कायम सोबत


                                                      खडतर चढाई




                                                सिथन पास पादाक्रांत केला


                           स्लायडींग - घसरत खाली उतरण्याची मज्जा वेगळीच असते.




                                                 शेळ्यांची सोबत


                                                     कँम्पच्या समोरील रमनीय निर्सग  



                                                     मार्गन पासची शिखरे 


                                 आमच्याकडे कुहुतुलाने पाहणा-या नजरा



                                       आमचा लिडर 



दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी कँम्पफायरची गरज होतीच.आजही आठवण येते त्या कँम्पफायरची.